शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे रखडली

By admin | Updated: June 23, 2014 00:29 IST

सोयगाव : राज्यातील गटसचिवांनी दि. ५ जूनपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

सोयगाव : राज्यातील गटसचिवांनी दि. ५ जूनपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नवीन कर्ज मिळेल या आशेने कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायटीची बेबाकी मिळत नसल्याने कर्ज प्रकरणे रखडली आहेत. आधीच पावसाअभावी चिंतातुर असलेला शेतकरी बेबाकी मिळविण्यासाठी सोसायटीच्या चकरा मारून मेटाकुटीस आला आहे.शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळवून देणाऱ्या बँक व राष्ट्रीयीकृत बँकांमधील दुवा म्हणजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या. या सोसायट्या प्रत्यक्ष कर्ज वाटत नसल्या तरी पीक कर्जाची संपूर्ण प्रक्रिया व शिफारस सोसायट्या करीत असतात. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता व्याजदरही अत्यंत अल्प लावला जात असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोसायट्यांमार्फत पीक कर्ज काढतात. पीक कर्ज घेणे, फेडणे आणि पुन्हा घेणे या सालाबादप्रमाणेच्या प्रक्रियेला यंदा ब्रेक लागलेला आहे. सेवा सोसायट्यांचा कारभार पाहणाऱ्या गटसचिवांच्या काही मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून राज्यातील गटसचिव दि. ५ जूनपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज शेतकऱ्यांनी एप्रिल-मे महिन्यात भरून टाकलेले आहे. पुन्हा कर्ज घेण्यासाठी शेतकरी कर्ज प्रकरणाची जुळवाजुळव करीत असतानाच गटसचिव संपावर गेले. पीक कर्ज कोणत्याही बँकेचे घ्या; परंतु सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र आवश्यक आहे; परंतु गेल्या १५ दिवसांपासून बेबाकी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शेतकरी सोसायटी कार्यालयाच्या चकरा मारीत आहेत. संपावर असलेले गटसचिव सोसायटीत येतच नसल्याने शेतकरी तसाच परत जात आहे. सचिवांनी जिल्हा निबंधक कार्यालयासमोर निदर्शने केली तेव्हा दि. २० जूनपर्यंत मागण्या मान्य होऊन काम सुरू होईल असे वाटत होते; परंतु त्यानंतरही संप सुरूच आहे.आपल्याजवळ असलेले पैसे भरून टाकले. नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त आहे. संपकरी गटसचिव आणि शासन यांच्या भांडणात शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे अधिकार कुणाला तरी देऊन या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)