शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

ग्रामसेवकाकडून शेतकऱ्यांना मारहाण

By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST

परतूर : गारपीटग्रस्त यादीतील नावे का वगळली, अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाच संबंधित ग्रामसेवकाने मारहाण केल्याची घटना शहरात घडली.

परतूर : गारपीटग्रस्त यादीतील नावे का वगळली, अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाच संबंधित ग्रामसेवकाने मारहाण केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. परतूर तालुक्यातील वाढोणा येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी यांनी केले होते; परंतु वाढोणा या गावचे ग्रामसेवक चौधरी यांनी याच गावातील काही लोकांची नावे यादीतून वगळली होती. याची विचारणा करण्यासाठी काही शेतकरी ग्रामसेवक चौधरी यांच्याकडे गेले असता, जि. प. चे उपाध्याक्ष यांच्या घरासमोर आरोपी ग्रामसेवक चौधरी याने दोन क्रुझर गाडीत माणसे आणून फिर्यादी संतोष तनपुरे यांना फायटरने मारहाण केली. याप्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसेवकाने शेतकऱ्यास मारहाण करण्याची घटना परतूर तालुक्यात प्रथमच घडली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यास मदत तर मिळालीच नाही; परंतु मारपीट होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, सदरील ग्रामसेवकास निलंबित केले नाही, तर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संतोष तनपुरे, सर्जेराव साळवे, रामेश्वर तनपूरे, नवनाथ तनपुरे, वैजनाथ गोरे, अशोक तनपुरे, गोविंद तनपुरेंसह पन्नास शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.