शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कापसावरही ‘जीएसटी’ लागू झाल्याने शेतक-यांना फटका तर व्यापा-यांमध्ये गोंधळाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 17:47 IST

केंद्र सरकारने  जीएसटी कायद्याच्या तरतुदीत बदल केला असून आता जिनिंगसाठी कापसाची खरेदी करणा-या व्यापा-यांनाही पाच टक्के सेवा कर द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देया बदलाची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. आधीच कमी भावामुळे हैराण झालेल्या शेतक-यांना पांढ-या सोन्यातही जीएसटीचा फटका सहन करावा लागणार आहे. जीएसटीबाबत वेळोवेळी जारी होत असलेल्या बदलांच्या अधिसुचनेमुळे व्यापा-यांत गोंधळाचे वातावरण आहे.

वैजापूर (औरंगाबाद ) : केंद्र सरकारने  जीएसटी कायद्याच्या तरतुदीत बदल केला असून आता जिनिंगसाठी कापसाची खरेदी करणा-या व्यापा-यांनाही पाच टक्के सेवा कर द्यावा लागणार आहे. या बदलाची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. यामुळे आधीच कमी भावामुळे हैराण झालेल्या शेतक-यांना पांढ-या सोन्यातही जीएसटीचा फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान, जीएसटीबाबत वेळोवेळी जारी होत असलेल्या बदलांच्या अधिसुचनेमुळे व्यापा-यांत गोंधळाचे वातावरण आहे.

वैजापूर तालुक्यात कापसाचे मोठे क्षेत्र आहे.  तालुक्यातून दररोज अंदाजे दहा हजार क्विंटल कापूस गुजरात राज्यात पाठवला जातो तर जवळपास पाच हजार क्विंटल कापूस तालुक्यात सुरु असलेल्या तीन जिनिंग मिलमध्ये पाठवला जातो. यातून शेतकरी, व्यापारी व जीएसटी कराच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते.  सध्या वैजापूर शहर व ग्रामीण भागात कापसाला प्रति क्विंटल चार हजार ते ४२०० रुपये भाव मिळत आहे. येथील उद्योजक शांतीलाल पहाडे यांच्या घायगाव शिवारातील भाग्योदय जिनिंगमध्ये ए दर्जाच्या कापसाला साडेचार हजार व बी दर्जाच्या कापसाला चार हजार दोनशे रुपयांचा भाव आहे. त्यामुळे या मिलमध्ये सध्या कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक आहे. सरकारने जीएसटीमध्ये रॉ कापसाचा समावेश केल्याने आम्हाला शेतक-यांना प्रतिक्विंटल साधारणपणे दोनशे रुपये कमी भाव द्यावा लागेल, असे पहाडे यांनी सांगितले. सरकारने कापसाच्या खरेदीवरसुद्धा जीएसटीचा बोजा टाकल्याने शेतक-यांचे नुकसान होणार असून त्याचा फटका काही प्रमाणात व्यापा-यांनाही बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

४५०० वरच स्थिरावला कापसाचा भावयंदा विविध कारणांनी  शेतक-यांना कापूस पिकावर मोठा खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे. अशा स्थितीत कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेवर असलेल्या शेतक-याला केवळ ४४०० ते ४५०० रुपये क्विंटल भाव खासगी व्यापारी देत आहे. यामुळे शासनाकडून कापूस उत्पादक शेतकºयांची मोठी कुचंबणा होत आहे.

शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडलेकापूस वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. अव्वाच्या सव्वा मजुरी वाढविली असून कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातून कापूस घरी कसा आणावा, याची चिंता शेतक-यांना लागली आहे. बाजारपेठेतही भाव मिळत नसल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तालुक्यात कापसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मात्र, यंदा कापूस उत्पादक शेतकरी मजुरांअभावी त्रस्त झाले आहेत. मजुरीचा दर सव्वाशे रुपयांचा २०० रुपयांवर जावून पोहचला आहे. तर कापूस वेचणीसाठी ७ ते ८ रुपये किलो दर द्यावा लागत आहेत. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच अधिक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मजुरीसोबतच वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. कापूस निघाल्यानंतरही बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतक-यांची कोंडी झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस