शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; अस्मानी संकट, कर्जबाजारीपणावर उपाय सापडेनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 15:48 IST

कुठे तरी दोन पैसे हाती येण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांची झोळी पावसाने रिकामी केली.

औरंगाबाद : मराठवाड्यात आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाची वाट लागली. कुठे तरी दोन पैसे हाती येण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांची झोळी पावसाने रिकामी केली. अस्मानी संकट, नैराश्य आणि कर्जबाजारीपणामुळे महिनाभरात ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ५९ पैकी ४६ प्रकरणे चौकशीअभावी प्रलंबित आहेत. यामध्ये १२ प्रकरणे पात्र तर एका प्रकरणाला सरकारी चौकशी समितीने अपात्र ठरविले.  

आॅक्टोबरअखेरपर्यंत विभागात ७१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीस आलेली मका, सोयाबीन, डाळी, कापूस पिकांची माती केली. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. या सरत्या दशकात तीन वर्षे पाऊस बऱ्यापैकी झाला. नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत गेला. कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ यामुळे नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची विवंचना शेतकऱ्यांसमोर आहे. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक १४ आत्महत्या परभणी जिल्ह्यात झाल्या असून, औरंगाबाद ७, जालना ७, हिंगोली २, नांदेड ७, बीड १३, लातूर ६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 

३१ आॅक्टोबरपर्यंतची आकडेवारी अशी जिल्हा    आत्महत्याऔरंगाबाद    १०७जालना    ८०परभणी    ७२हिंगोली    २८नांदेड    ९३बीड    १५८लातूर    ७८उस्मानाबाद    ९९एकूण    ७१५

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीMarathwadaमराठवाडा