शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी लै भारी; गव्हाचे हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम

By बापू सोळुंके | Updated: March 31, 2023 18:49 IST

कृषी विभागाची स्पर्धा: शेतकऱ्यांनी कमी खर्चात पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे,यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयोग केले जातात.

छत्रपती संभाजीनगर: लहरी निसर्गावर मात करीत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी कृषी विभागाने गतवर्षी रब्बी हंगामासाठी घेतलेल्या स्पर्धेत गहू उत्पादनात राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. हारदे यांनी हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन घेतले.

शेतकऱ्यांनी कमी खर्चात पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे,यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयोग केले जातात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीचे अधिकारी करीत असतात. गेल्या काही वर्षापासून कृषी विभागाच्यावतीने राज्यातील  शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पीक उत्पादन स्पर्धा घेण्यात आली होती. विविध गहू या सर्वसाधारण  कॅटेगिरीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच कृषी विभागाने जाहिर केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे राज्यात प्रथम आले आहे . तर हेक्टरी ७६क्विटल उत्पादन घेऊन  सोमनाथ संपत पेखळे(रा.माडसावंगी,ता.नाशिक ) यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. तर नाशिक जिल्ह्यातीलच वासळी येथील श्रीराम किसन मते हे राज्यात तिसरे आले आहेत. त्यांनी हेक्टरी ७५क्विंटल उत्पादन घेतले.  हारदे यांनी हेक्टरी  खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील प्रगतीशील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यांच्याकडे ३५ एकर शेती आहेत. पोक्रा योजनेंतर्गत त्यांनी शेततळी, ठिबक सिंचन, शेडनेट आदी विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी त्यांना मार्गदर्शन करीत असतात. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गहू कॅटेगिरीमध्ये कृषी उत्पादन स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी  या स्पर्धेत सहभाग नाेंदविला हाेता.

नियोजनबद्ध लागवड केलीगतवर्षी आम्ही केशवपुष्प ऍग्रो इंडिया कंपनीचे २० किलो बियाणे वापरुन अर्धा एकरवर गहू पेरला होता. पारंपारिक पद्धतीने पेरणी न करता त्यांनी चार इंज अंतरावर दोन कोम्ब याप्रमाणे गव्हाची लावणी केली. तसेच दोन  सरीमध्ये १२ इंचाचे अंतर ठेवले. पेरणीपूर्वी  पाच ट्रॉली शेणखत टाकले होते. पेरणीनंतर बुरशीनाशक, तणनाशकची प्रत्येकी एक फवारणी केली. एक गोणी डिएपी तर एक गोणी युरीयाची टाकले.  प्रती गुंठा ७८ किलो याप्रमाणे २० गुंठे क्षेत्रात१६ क्विंटल उत्पादन झाले.- राजू आसाराम हारदे, शेतकरी 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद