शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 9, 2014 00:29 IST

उस्मानाबाद : जवळपास एक महिना दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली़

उस्मानाबाद : जवळपास एक महिना दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली़ पावसाच्या आगमनाने बळीराजाच्या चेहऱ्यावरील चिंतेचे ढग बाजूला झाले असून, काही भागात पेरणीस प्रारंभ झाला आहे़ सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे यंदा बहुतांश भागातील ओढे, नद्या, नाल्यांमधून प्रथमत:च पाणी वाहिले़शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेला यंदाचा खरीप हंगाम पावसाने ओढ दिल्याने धोक्यात आला होता़ रविवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ रविवारी जिल्ह्यात सरासरी १२़७८ मिमी तर सोमवारी दिवसभरात २५़७४ मिमी पाऊस झाला़ सोमवारी उस्मानाबाद तालुक्यात ३५़६० मिमी, तुळजापूर तालुक्यात ३६़५० मिमी, उमरगा तालुक्यात ४५़२० मिमी, लोहारा तालुक्यात २८ मिमी, भूम तालुक्यात २०़६० मिमी, कळंब तालुक्यात २८़५० मिमी, परंडा तालुक्यात २़२० मिमी तर वाशी तालुक्यात ९़३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ सलग तीन दिवस पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या काही भागात पेरणीस प्रारंभ झाला आहे़उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, आळणी, बावी, करजखेडा आदी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली़ शहरातील अनेक भागातील नाल्या तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते़ तर भोगावती नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होते़ नदीच्या पुलावर पाणी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह शहरवासियांची मोठी गर्दी झाली होती़ तर काही भागातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शहरवासियांना काही प्रमाणात कसरत करीत मार्ग काढावा लागत होते़लोहारा तालुक्यात हलक्या सरीगतवर्षी लोहारा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे परिसरातील प्रकल्प बऱ्यापैकी भरले होते. दरम्यान, जिल्ह््यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असला तरी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना हलक्या सरीवरच समाधान मानावे लागत आहे. मंगळवारी दुपारीही अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याचे शेतकरी सांगतात. दिवसभर हलक्या सरीतुळजापूर : यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सतत तीन दिवस पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या तयारीला लागला आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवारी सकाळी शहर व परिसरात पावसाच्या हलक्या व मध्यम सरी बरसल्या. त्याचप्रमाणे मंगळवारी पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यानंतर रात्री ७.३० वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काक्रंबा परिसरात दुपारी ४ वाजल्यापासून रिमझिम पाऊस पडत होता. (वार्ताहर)उमरग्यात रात्रीत ४५ मि.मी. पाऊसउमरगा : तालुक्यामध्ये सोमवारी रात्री दमदार पाऊस झाला. तुरोरी, कसगी, तलमोड, कोरेगाव या भागातील नदी-नाले तुडंूब भरून वाहिले. काटेवाडी, चिंचोली (भुयार) या भागातील साठवण तलावात बऱ्यापैकी साठा झाला आहे, असे काटेवाडीचे ग्रा.पं. सदस्य मनोज सूर्यवंशी यांनी सांगितले. उमरगा सर्कलमध्ये ६४, मुरुम सर्कलमध्ये ५२, दाळींब सर्कलमध्ये ७५, मुळज सर्कलमध्ये २५ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी मुळज, तुरोरी, दापका, चिंचोली (ज), डिग्गी, बेडगा, तलमोड, जकेकूर, येळी, रामपूर, काटेवाडी इ. भागांत रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीची लगबग सुरु झाली आहे. खरीप पेरणीसाठी तालुक्यातील जवळपास ७५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. पावसाला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांचा तूर आणि सोयाबीनच्या पिकाकडे यंदा कल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.आजवरचा पाऊसउस्मानाबाद : अख्खा जून महिना सरला तरी वरूणराजाची कृपा झाली नव्हती. जूलै महिना उजाडल्यानंतर पावसाला सुरूवात झाली आहे. मागील तीन दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे.उमरगा तालुक्यात आजवर एकूण पाऊस ९२.०० मिमी इतका झाला आहे. त्यानंतर लोहारा तालुक्यात ९०.७, तुळजापूर ८१.०८, कळंब ८०.०१, भूम ७४.०० तर परंडा तालुक्यामध्ये ५९.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. गतवर्षीही कमीच पाऊस झाला होता. यंदाही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमीच पाऊस पडला आहे. भिंत कोसळून चौघे जखमी कळंब : भिजलेली भिंत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले़ ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास कळंब शहरातील पेठ भागात घडली़ दरम्यान, नगर पालिकेने नाली कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे पाणी साचून भिंत पडल्याचे समोर येत आहे़ शहरातील कसबा पेठ परिसरात नगर पालिकेने नाल्यांचे बांधकाम सुरू केले आहे़ हे काम करण्यासाठी या भागातील घरांच्या भिंतीलगत खोदकाम करण्यात आले आहे़ रविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते़ हे पाणी घरांच्या भिंतीमध्ये जात असल्याने अनेकांच्या भिंती भिजल्या होत्या़ सोमवारी रात्रीच्या सुमारास या भागातील महादेव संभाजी नरवडे (वय-४०) यांच्या घराची भिजलेली एक भिंत अचानक कोसळली़ यात महादेव नरवडे, त्यांच्या पत्नी अनिता (वय-३५),मुलगी वर्षा (वय-१०), मुलगा आदित्य (वय- ५) हे जखमी झाले़ त्यांच्यावर कळंब येथील ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़ दरम्यान, तहसीलदार वैशाली पाटील, पोलिस पाटील नरेंद्र ओझा यांनी घटनास्थळाची पाहणी केली़पडलेला पाऊसउस्मानाबाद ३५.६०तुळजापूर३६.५०उमरगा४२.५०लोहारा२८.००भूम२०.६०कळंब२८.५०परंडा०२.२०वाशी०९.३०एकूण२५.७४भूम तालुक्यात सर्वात कमी पाऊस वालवड सर्कलमध्ये झाला असून त्यापाठोपाठ अंबी, माणकेश्वर सर्कलमध्ये अद्यापही पावसाचे प्रमाण कमी आहे. तालुक्यात ७ जून ते ७ जुलै पर्यंत झालेला पाऊस भूम १३९ मिमी, अंबी-४७ मिमी, वालवड- ४२, ईट- ७३, माणकेश्वर ६९ मिमी. तालुक्यात मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, कोल्हापुरी बंधारे व भूगर्भातील जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. पाणीसाठ्यात वाढ झाली तरच खरीप व रबी हंगाम समाधानकारक राहणार आहे. सोनगिरी पूल पाण्याखालीभूम : शहर व परिसरात सोमवारी रात्री संततधार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी सोनगिरी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भूम-वाशी रस्त्यावरील सोनगिरी पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे याही मार्गावरील वाहतूक बराचकाळ ठप्प होती. भूम शहरामध्ये दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अर्धा तास पडत होता. वालवड परिसरातही पावसाने हजेरी लावली. त्याचप्रमाणे माणकेश्वर परिसरात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या तयारीला लागले आहेत.तेरणा नदीपात्र तुडुंब...येरमाळा : कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरातही सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारपर्यंत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र दुपारच्या सुमारास तेरणा नदी पात्राच्या क्षेत्रात जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे तेरणा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत होते. तसेच लहान मोठ्या नाल्यांनाही पाणी आले होते. या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.दोन तास वाहतूक ठप्पतेर : उपळा परिसरामध्ये दुपारी २ वाजण्याच्या सुमारास धो-धो पाऊस बरसला. या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. तेर-उपळा या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे जवळपास दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे तेर परिसरातही दुपारच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.४० मि.मी.ची नोंदनळदुर्ग : शहर व परिसरामध्ये सोमवारी रात्री शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस झाला. एकाच रात्रीत जवळपास ४० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.जकापूर प्रकल्पात पाणीसाठा येणेगूर : उमरगा तालुक्यातील जकापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गुंजोटी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जकापूर प्रकल्पात पाणीसाठा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येळी आणि जकेकूर या गावांनाही जोरदार पावसाने झोडपले. मात्र दाळींब आणि येणेगूर परिसरात हलक्या सरी बरसल्या. उमरगा शहर व परिसरात सोमवारी रात्री संततधार पाऊस झाला. तर मंगळवारी दिवसभर अधून-मधून हलक्या सरी कोसळत होत्या. त्याचप्रमाणे पेठसांगवी येथे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जवळपास १ तास बऱ्यापैकी पाऊस झाला.पेरणीयोग्य पाऊसपरंडा : शहरासह परिसरामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी दुपारी डोमगाव, सोनारी, डोंजा, आलेश्वर आदी भागात पाऊस झाला. आंधोरा शिवारातही सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत चांगला पाऊस झाला. हा पाऊस पेरणीयोग्य असल्याचे शेतकरी सांगत आहेत.