शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत फराळाची फोडणी महागली; सोयाबीन, सूर्यफूल, सरकी तेल शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:20 IST

सर्वात स्वस्त तेल म्हणून पामतेल विकत होते; पण या तेलाचे भावही ९५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

ठळक मुद्देऐन दिवाळसणाच्या तोंडावर खाद्यतेलात भाववाढ झाली आहे.आवक खूप कमी व सणामुळे ग्राहकांकडून  मागणी अधिक

औरंगाबाद : ऐन दिवाळीत खाद्यतेलाचे भाव कडाडले असून, लिटरमागे ६ ते १५ रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. आता फोडणी देणे महागल्याने गृहिणींच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

सूर्यफूल तेल ११५, सोयाबीन तेल १०५ रुपये, सरकी तेल १००, तर पामतेल ९५ रुपये.  दुकानातील फलकावर  खाद्यतेलाचे भाव पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. ऐन दिवाळसणाच्या तोंडावर खाद्यतेलात भाववाढ झाली आहे. व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, सोयाबीन, सरकी व पामतेलाचे भाव पहिल्यांदा १०० पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. दिवाळी असल्याने तेलाची मागणी वाढते. महिनाभरात  लिटरमागे १० रुपये वाढ झाली. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री लागणार आहे. मात्र, शेंगदाणा तेल व करडी तेलात भाववाढ झाली नाही; पण या खाद्यतेलाचे भाव १५० रुपयांपेक्षा अधिक असल्याने ८० टक्के ग्राहक सोयाबीन, सरकी तेल खरेदी करतात. सर्वात स्वस्त तेल म्हणून पामतेल विकत होते; पण या तेलाचे भावही ९५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. यामुळे ग्राहक सरकी, सोयाबीन तेल खरेदीला पसंती देत आहेत.

अतिपावसाने लांबला तेलबियांचा हंगाम परतीच्या पावसाने यंदा तेल बियांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे सरकी व सोयाबीनचा हंगाम लांबला, तसेच निर्यातही सुरू आहे. त्यात मलेशियाहून पामतेलाची आयात कमी झाली. याचा परिणाम हलक्या प्रतीच्या खाद्यतेलाच्या किमती वाढण्यावर झाला आहे.

मागणी वाढली दिवाळीनंतर बाजारात आवक वाढून सोयाबीन, सरकी व शेंगदाणा, खाद्य तेलाचे भाव कमी होतील. सध्या आवक खूप कमी व सणामुळे ग्राहकांकडून  मागणी अधिक वाढल्याने सर्वच तेलाचे  भाव सध्या वधारले आहेत. - किशोर मिटकर, खाद्यतेल विक्रेते

नफेखोरीवर लगाम आवश्यक लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे नोकरीवर आहेत त्यांची पगार कपात झाली. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाववाढ होत असल्यामुळे जगणेच अवघड झाले आहे.  राज्य सरकारने नफेखोरीवर लगाम घालणे आवश्यक आहे.- सीमा भालेराव,   गृहिणी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न