शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब अंगणात तर चोरटे घरात; घरमालक बाहेर झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 17:50 IST

१ लाख रुपयांची रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीस

ठळक मुद्देकुटुंबातील सदस्य उकाड्यामुळे अंगणात झोपले होते 

सोयगाव : तालुक्यातील उप्पलखेडा येथील एका घराचे कुलूप तोडून २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना रविवारी (३०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे घरमालक उकाड्यामुळे समोरच्या अंगणात झोपले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे आढळून आले. याप्रकरणी बनोटी दुरक्षेत्रात सोमवारी सायंकाळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत असल्याने बहुतेक शेतकरीवर्ग घराच्या अंगणात झोपतात. रविवारी उप्पलखेडा येथील शेतकरी शेख याकुब शेख माजीद हे सुद्धा मुलगी आणि पत्नीसह  घरासमोरील अंगणात झोपले होते. तर त्यांची दोन मुळे शेतात झोपण्यास गेली होती. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडत रोख रक्कमेसह २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी याकुब यांना कुलूप तुटल्याचे आढळून आले. त्यांनी लागलीच बनोटी दुरक्षेत्रात चोरीचा गुन्हा दाखल केला.  

यानंतर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात १ लाख रुपयांची रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रतापराव बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करून चोरांचा माग काढण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक शेजारील जळगाव जिल्ह्य़ात पाठविण्यात आले आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गीते, ठाणे अंमलदार एस.एस.पवार, विकास दुबेले, श्रींकात पाटील, दिलीप तडवी यांचे पथक अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद