शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तिसरे अपत्य लपविण्यासाठी कागदपत्रात खाडाखोड; निवृत्त वैद्यकीय अधीक्षकासह ६ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:33 IST

पैठण तालुक्यातील प्रकरण: तिसऱ्या अपत्यामुळे सदस्यत्व जाईल, कागदपत्रात केली खाडाखोड; निवृत्त वैद्यकीय अधीक्षकासह ६ जणांविरुद्ध गुन्हा

पाचोड : तिसरे अपत्य झाल्याने ग्रा.पं.चे सदस्यत्व जाईल, या भीतीने पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथील एका ग्रा.पं. सदस्याने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासकीय कागदपत्रात खाडाखोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, कोळी बोडखा येथील ग्रामपंचायत सदस्य देवीदास दुर्योधन मगरे यांच्या पत्नी मीनाक्षी या प्रसूतीसाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात ६ मे २०२१ रोजी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांच दिवशी त्यांना तिसरे अपत्य झाले. तिसरे अपत्य झालेल्या ग्रा.पं. सदस्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होते, असा शासन निर्णय असल्याने आपले ग्रा.पं. सदस्यत्व वाचविण्यासाठी देवीदास मगरे यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भोजने यांना हाताशी धरून प्रसूती झालेल्या महिलेच्या नावातील रजिस्टरवर खाडाखोड करून तेथे मीनाक्षी देवीदास मगरेऐवजी देवीदास यांचे मेव्हणे कैलास पोटफाडे यांच्या पत्नी लक्ष्मी कैलास पोटफोडे (रा. राक्षसभुवन) असे बनावट नाव नोंदविले. फिर्यादी दिनेश मगरे यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागितली. त्यामुळे ही बाब उघडकीस आली.

न्यायालयाच्या आदेशानुसार झाली कारवाईयाप्रकरणी दिनेश मगरे फिर्यादी यांनी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे मगरे यांनी पैठण येथील न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी देवीदास दुर्योधन मगरे, मीनाक्षी देवीदास मगरे, कैलास सुदाम पोटफोडे, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भोजने, अधिपरिचारिका मिसाळ यांच्याविरोधात पाचोड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलिस उपनिरीक्षक राम बाराहाते करीत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर