शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी खोटी कागदपत्रे; ७१ शेतकऱ्यांनी केली महाराष्ट्र बँकेची १ कोटीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 13:42 IST

False documents for crop loans : खरीप हंगामात महाराष्ट्र बँकेच्या बिडकीन येथील शाखेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले होते.

ठळक मुद्देबँकेने पीककर्जाच्या कागदपत्रांची ऑनलाइन फेरतपासणी केली शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे दाखल केल्याचे सत्य समोर आले.

बिडकीन : पीक कर्ज घेण्यासाठी ७१ शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे बँक ऑफ महाराष्ट्रच्या बिडकीन शाखेत दाखल करून १ कोटी ९ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. बँकेची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार खरीप हंगामात महाराष्ट्र बँकेच्या बिडकीन येथील शाखेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. बँकेने पीककर्जाच्या कागदपत्रांची ऑनलाइन फेरतपासणी केली असता शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे दाखल केल्याचे सत्य समोर आले.या सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ऑनलाइन डाऊनलोड केली आहेत. त्या कागदपत्रांवर तलाठ्यांच्या सह्या व शिक्के मारण्यात आले. बँकेने ही कागदपत्रे सत्य असतील, असे गृहीत धरून पीक कर्ज मंजूर केले. मात्र, जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतीविषयक कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी केली असता. जास्त पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेत जमीन क्षेत्र वाढविल्याचे उजेडात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यातही दस्तऐवजमध्ये चुकीच्या नोंदी केल्याचे आढळून आले.

जास्तीची शेत जमीन दाखवून बँकेची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मूळ कागदपत्रे दाखल करण्यासाठी बँकेने नोटिसा पाठवल्या. त्यातील काही शेतकऱ्यांनी मूळ कागदपत्रे त्यातील निम्म्या शेतकऱ्यांनी रक्कम भरून आपले खाते बंद केले. मात्र, ७१ शेतकऱ्यांनी नोटीसला काहीच उत्तर दिले नाही. मूळ कागदपत्रे दाखल केली नाहीत. या शेतकऱ्यांनी १ कोटी ९ लाख ७१ हजार रुपयांची बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी अवयकुमार दुबे यांनी गुरुवार, ७ जानेवारी रोजी सायंकाळी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या ७१ शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज उदावंत पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrop Loanपीक कर्ज