शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निर्धारित वेळेत दोषारोपपत्र दाखल न करणे हा न्यायालयाचा अवमान; तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:20 IST

राज्य शासन आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्व कारवायांमध्ये कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून ६० ते ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देतपास अधिकाऱ्याविरुद्ध खातेनिहाय कारवाईचीही तरतूदन्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईची तरतूद

- प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : निर्धारित वेळेत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न करणाऱ्या तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करून पूर्तता अहवाल सादर करण्यासाठी निकालाची प्रत जिल्हा सरकारी वकील आणि पोलीस आयुक्तांना पाठविण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय के. कुलकर्णी यांनी १ एप्रिल २०२१ रोजी दिला आहे.

तपास अधिकाऱ्याने ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे ३ लाख रुपये किमतीचा १५ किलो १६ ग्रॅम गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याच्या गुन्ह्यातील ५ आरोपींना ‘अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ दाखल गंभीर गुन्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६७ (२) नुसार जामीन मंजूर करावा लागत आहे. आरोपींचे जामीन अर्ज गुणवत्तेवर नामंजूर झाल्याचे तपास अधिकाऱ्याला माहीत होते. अशा परिस्थितीत त्याने निर्धारित वेळेत दोषारोपपत्र दाखल करणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी तसे केले नाही यावरून त्यांनी आरोपींना जामीन मिळण्यासाठी त्यांच्याशी हातमिळवणी केल्याचे दिसते. असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदविले आहे.

न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईची तरतूदराज्य शासन आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्व कारवायांमध्ये कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून ६० ते ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेत दोषारोपपत्र का दाखल केले नाही याचा खुलासा देताना तपास अधिकाऱ्याने शपथपत्र आणि केस डायरी दाखल करावी. त्यावर समाधान झाले नाही तर न्यायालयाने तशी नोंद करावी. सरकारी वकिलाने तपास अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यास सक्षम असलेल्या अधिकाऱ्यास अहवाल सादर करून त्यांनी काय कारवाई केली, हे न्यायालयाला कळविणे अपेक्षित आहे.

कारवाईची तरतूद कायद्यातया प्रक्रियेचा अवलंब न करणाऱ्या तपास अधिकाऱ्याविरुद्ध खातेनिहाय कार्यवाहीसह न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणास्तव कारवाईची तरतूद कायद्यात आहे. तसेच व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती त्या अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईची मागणी करू शकेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने भुलाबाई भिकाजी म्हात्रे विरुद्ध शंकर बारकाजी म्हात्रे या प्रकरणात नोंदविले असल्याचा उल्लेख सत्र न्यायालयाने आदेशात केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयAurangabadऔरंगाबाद