शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समितीवरील विश्वास उडाला; व्यापाऱ्यांची पुन्हा न्यायालयात धाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:15 IST

न्यायालयाने यापूर्वीच मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांना सर्वप्रथम जाधववाडीत प्लॉट देण्याचे आदेश दिले होते.

औरंगाबाद : न्यायालयाने यापूर्वीच मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांना सर्वप्रथम जाधववाडीत प्लॉट देण्याचे आदेश दिले होते. मात्र, येथील व्यापाऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या काही प्लॉटचे परस्पर रजिस्ट्रेशन करून जालना व अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांना दिल्याचा आरोप केला आहे. ते प्लॉट पुन्हा मिळावेत यासाठी मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. कृउबा समितीवर आमचा भरवसा राहिला नसून पुढील ५० वर्षांचा विचार करूनच होलसेल बाजाराचा आराखडा तयार करावा. त्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी जनरल किराणा मर्चंट असोसिएशनने केली आहे. 

यासंदर्भात संघटनेचे सचिव देवेंद्र सेठ यांनी सांगितले की, महानगरपालिकेने सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्याचा डंका कृउबा समितीचे सभापती व अन्य संचालक पिटवीत आहेत. मात्र, मनपाने आराखड्याला मंजुरी देताना अनेक अटी टाकल्या आहेत. याचा भविष्यात जाधववाडीत दुकान बांधणाऱ्या व्यापाऱ्यांना होणार आहे. मोंढा स्थलांतरासाठी येथील होलसेल व्यापारी तयार आहेत; पण निर्विवाद प्लॉट देण्यात यावेत हीच मागणी आहे. यासाठी २००६ मध्ये ११९ व्यापाऱ्यांनी १ कोटी ३५ लाख रुपये कृउबात जमा केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आतापर्यंत ६ कोटी ५० लाख रुपये कृउबाच्या तिजोरीत जमा करण्यात आले. त्यात आणखी १९६ व्यापाऱ्यांची भर पडली.

निर्विवाद प्लॉटसाठी संघटना वेळोवेळी न्यायालयात गेली व बाजार समितीने होलसेल बाजार उभारताना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे, असे न्यायालयाचे आदेश होते. त्यानुसार कृउबाच्या संमतीने मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सोडत पद्धतीने व्यापाऱ्यांना प्लॉटचे नंबर दिले व त्याची यादी कृउबात देण्यात आली. धनादेश देताना व्यापाऱ्यांचे नाव, धनादेश नंबर व त्यास कोणता प्लॉट देण्यात येणार आहे हे लेखी स्वरुपात कृउबाने लिहून दिले आहे, असे असतानाही मोंढ्यातील व्यापाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या प्लॉटपैकी काही प्लॉट कृउबाने जालना, जाधववाडी व अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांना दिले आहेत.

यासंदर्भात कृउबाने शुक्रवारी मोंढ्यातील व्यापाऱ्यांना नोटीस पाठविल्या व मूळ प्लॉटऐवजी दुसरेच प्लॉटचे नंबर दाखवून त्या प्लॉटची उर्वरित रक्कम ७ दिवसांत भरण्याचे आदेश दिले, यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कृउबाने मोंढ्यातील व्यापाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यायालयाच्या देखरेखीखाली जाधववाडीतील किराणा होलसेल बाजारपेठ उभारण्यात यावी, व्यापाऱ्यांनी दिलेली रक्कम महारेराच्या नियमानुसार कृउबाने किराणा होलसेल बाजारपेठेच्या विकास कामासाठीच वापरावी, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतल्याचे त्यांनी नमूद केले. 

४० मीटरचा रस्ता झाला १८ मीटर जनरल किराणा मर्चंट असोसिएशनचे संजय कांकरिया यांनी सांगितले की, मोंढ्यातील व्यापाऱ्यांना कृउबाने सुधारित आराखडा दाखविला. त्यात किराणा होलसेल बाजारात अंतर्गत रस्ते ४० मीटरचे दाखविण्यात आले. नंतर यात बदल करून आता फक्त १८ मीटरचे रस्ते दाखविण्यात आले आहेत. एक ट्रक ३० ते ४० टनाचा असतो. ८ तास खाली होण्यास लागतात. पुढील ५० वर्षांचा विचार करून आराखडा तयार करण्यात यावा. कृउबा समिती फक्त व्यापाऱ्यांना लीज डीडवर प्लॉट देऊन मोकळे होण्याचा विचार करीत आहे. मात्र, भविष्यात वाढणाऱ्या रहदारीच्या अडचणींना व्यापाऱ्यांनाच तोंड द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयMarketबाजार