शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अकरावी प्रवेशाच्या नुसत्याच फेºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:46 IST

यंदा महापालिका कार्यक्षेत्रात अकरावीसाठी राबविण्यात आलेली आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया अयशस्वी ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा महापालिका कार्यक्षेत्रात अकरावीसाठी राबविण्यात आलेली आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया अयशस्वी ठरली आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या सहा फेºया पूर्ण झाल्या, तरीही तब्बल ६ हजार जागा रिकाम्याच राहिल्या आहेत. आता उद्यापासून दहावी परीक्षेत ‘एटीकेटी’ मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सातव्या प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.जून महिन्यापासून अकरावीसाठी औरंगाबादेत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सुरुवातील प्रवेशाच्या चार फेºया राबविण्यात आल्या. त्यानंतर विशेष फेरी राबविण्यात आली, तरीही विद्यार्थ्यांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ‘प्रथम येणारास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित प्रवेश फेरी राबविण्यात आली. या सहाही फेºयांमध्ये २२ हजार जागांपैकी १६ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचा दावा शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केला आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल २९ आॅगस्ट रोजी जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यात १ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान आॅनलाइन नोंदणीची मुदत होती. उद्या ९ ते ११ सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांना अ‍ॅलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. तथापि, यंदा आॅनलाइन प्रवेशाचा प्रयोग पार फसला आहे. शहरातील महाविद्यालयांनीही अर्थ लाभाच्या उद्देशाने अगोदर मॅनेजमेंट कोट्यातील पूर्ण जागा भरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाविद्यालयांनी विनाअनुदानित तसेच पसंतीच्या विषयासाठी सेल्फ फायनान्स जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. त्यामुळे आजघडीला अनुदानित तुकड्यांवरील मोठ्या प्रमाणात जागांवर प्रवेशच झाले नाहीत. परिणामी, या तुकड्यावर कार्यरत शिक्षक हे अतिरिक्त होण्याच्या भीतीपोटी अस्वस्थ आहेत. यामध्ये शहरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे.दुसरीकडे, पाहिजे तो विषय किंवा हवे त्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे पसंत केले.आॅनलाइन प्रवेशाला विलंब लागणार, या भीतीपोटी ग्रामीण भागातून अथवा दुसºया जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी शहरात आलेच नाहीत. त्यामुळे आज सप्टेंबर महिन्यातही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.