शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले; छत्रपती संभाजीनगरात ३२ प्रभाग, १२६ वॉर्ड

By मुजीब देवणीकर | Updated: March 2, 2024 14:40 IST

महायुतीच्या या निर्णयामुळे काही वर्षांपासून मनपा निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला १२६ वॉर्डानुसार चार वॉर्डांचे ३० प्रभाग करावे लागतील. शेवटच्या सहा वॉर्डांसाठी दोन प्रभाग ३ नुसार करावे लागतील. महायुतीच्या या निर्णयामुळे काही वर्षांपासून मनपा निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले आहेत. लवकरच निवडणुका होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २० एप्रिल २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपला. चार वर्षांपासून प्रशासक कारभार पाहत आहेत. महापालिकेत कारभारी नाहीत. १९८२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही निवडणुका १९८८ मध्ये घेतल्या होत्या. सहा वर्षे प्रशासक कामकाज पाहत होते. १९८८ नंतर प्रथमच महापालिकेत प्रशासक नेमण्यात आले आहेत. मागील चार वर्षात राज्य शासनाने एकदा जुन्या वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तीन वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तर महापालिकेने प्रक्रियाही पूर्ण केली. सूचना हरकतीपर्यंत प्रक्रिया करून ठेवली. मात्र, निवडणुकांची घोषणा झालीच नाही. गुरुवारी राज्य शासनाने महापालिका निवडणुकांच्या मुद्याला स्पर्श करीत ४ वॉर्डांचा प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे इच्छुकांना निवडणुकीच्या आशेचा किरण दिसून येतोय.

दोनदा विरसनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवारांनी कोरोना संसर्ग काळात मोठ्या प्रमाणात किट वाटप, नागरिकांची मदत करण्याचे काम केले. निवडणुका लवकरच घेण्यात येतील, अशी घोषणा दोन वेळेस झाली. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे इच्छुकांचा हिरमोड झाला. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा मावळला होता. मोजके इच्छुकच सध्या आपल्या वॉर्डांमध्ये सक्रिय आहेत.

काय म्हणाले अधिकारी ?महापालिकेत निवडणूक विभागाचे कामकाज पाहणारे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला हे खरे आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. चार वॉर्डांच्या प्रभागात लोकसंख्येचे निकष पाहिले जातात. मनपा हद्दीत १२६ वॉर्ड आहेत. ४ वॉर्डच्या नियमाने ३० प्रभाग आपल्याकडे होतील. शेवटच्या सहा वॉर्डांसाठी ३ वॉर्डांचे दोन प्रभाग करावे लागतील, असा अंदाज आहे. प्रभागांची संख्या कमी जास्त होऊ शकते. आयोगाकडून सूचना आल्यावर अधिक बोलणे सोयीस्कर होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका