शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आमने-सामने: केवळ नामांतराने शहरांच्या विकासाचे प्रश्न सुटतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:11 IST

शहरांच्या नामांतराची मागणी अधूनमधून होत असते. सत्तेतील पक्ष निर्णय घेत नाहीत. मात्र, केवळ नामांतराने विकासाचे प्रश्न सुटतील का? 

शहरांच्या नामांतराची मागणी अधूनमधून होत असते. सत्तेतील पक्ष निर्णय घेत नाहीत. मात्र, केवळ नामांतराने विकासाचे प्रश्न सुटतील का? आ. अंबादास दानवे, शिवसेना प्रवक्तेऔरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण करणे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे, त्यात काहीही बदल होणार नाही. छत्रपती संभाजी महाराज आधुनिक विकासाचे विचारवंत होते, ते नुसते योद्धा नव्हते. आजही शिवकालीन बंधारे आहेत. त्यांच्या काळातील बारवा, जलयोजना कार्यरत आहेत. संभाजी महाराजांच्या काळात रयतेला सुविधा देण्याच्या अनेक योजना राबविल्या गेल्या. शेतसारा, कर्जमाफीसारख्या योजनांचा आजही उल्लेख होतो. त्यामुळे संभाजीनगर असे नामकरण करण्यापूर्वी सर्व सुविधा जनतेला मिळाव्यात, अशी भूमिका शिवसेनेची आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी सुखसमृद्धी आणि नंतर संभाजीनगर, अशी भावना व्यक्त करण्यामागे विकासाची भावना आहे. शिवसेनाप्रमुखांनी संभाजीनगर नामकरणाचे वचन दिलेले आहे. ते मी पूर्ण करणारच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना सांगितले आहे. त्यातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे. मंत्रिमंडळात नामकरणाचा निर्णय झाला. सुरुवात म्हणून विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला. परंतु, केंद्र शासन निर्णय घेत नसल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.  

प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद औरंगाबादच्या नामकरणाची जाहीर भूमिका दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते करण्याची संधी होती. मात्र, ते तर फक्त बोलण्याचेच काम करत आहेत. इथल्या सभेत नामकरणाबाबत भाष्य करतील असे वाटले होते. प्रत्यक्षात मी म्हणतो म्हणजे नामकरण झालेच, केंद्राने हे करावे-ते करावे, आधी विमानतळाला नाव द्या, असली जबाबदारी झटकण्याची भाषा केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखवत जबाबदारी झटकायची, प्रश्नाला बगल देत पळ काढायचाच प्रयत्न दिसतो आहे. औरंगाबादच्या पाण्याचा, रस्त्याचा, कचऱ्याचा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अडीच वर्षांच्या काळात या प्रश्नांवर काय काम केले, याची माहिती पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यायला हवी. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात १,६०० कोटींची कामे मंजूर झाली होती, तीसुद्धा रखडवली. आता स्थानिक निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे २५० कोटींची घोषणा केली. पण, सामान्य जनतेलाही आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणांचा अर्थ समजतो. विकासकामांची भूकच नाही, याची जनतेला आता खात्री पटली आहे. नाहीतर अडीच वर्षांत नामकरणासह विकासाची अनेक कामे पूर्ण करता आली असती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद