शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकडे लागले डोळे ! औरंगाबादेत 40 हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:40 IST

आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात वॉक इन फ्रीजर आणि वॉक इन कुलर आहे. 

ठळक मुद्देलस निश्चितीनंतर साठवणूक यंत्रणा सज्जप्रशासनाच्या बैठकावर बैठका सुरू

औरंगाबाद : कोरोनाची लस वर्षअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या तयारीला शासकीय तसेच प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. आजघडीला सुमारे ४० हजार लिटर लस साठविण्याची क्षमता सज्ज आहे.

पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी रुग्णालयांतील डाॅक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास ३३ हजारांवर आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात वॉक इन फ्रीजर आणि वॉक इन कुलर आहे. या दोन्हींची क्षमता प्रत्येकी १२ क्युबिक मिटर इतकी आहे, तर छावणी येथेही १२ क्युबिक मिटर क्षमतेचे वॉक इन कुलर आहे. १ क्युबिक मिटर म्हणजे एक हजार लिटरची क्षमता होते. त्यानुसार ३६ हजार लिटरची क्षमता सध्या सज्ज आहे. मनपाकडे २४ आईस लाईन रेफ्रिजरेटर आहे. 

शीतगृहांची जय्यत तयारीलसींच्या साठ्यासाठी मोठी क्षमता असलेले ‘वॉक इन फ्रीजर’ आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेत केले जाणार आहे. फ्रीजरमध्ये  चालत जाता येऊ शकेल. या फ्रीजरची ४० क्युबिक मिटर इतकी क्षमता असणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात, रुग्णालयांत आईस लाईन रेफ्रिजरेटरची सुविधाही आहे. गरजेनुसार खासगी कोल्ड स्टोरेजचाही वापर केला जाऊ शकतो.

लस पोहोचण्यासाठी वाहनांचे नियोजनआरोग्य उपसंचालक कार्यालयात सर्वप्रथम लसीचा साठा दाखल होण्याची शक्यता आहे. तेथून त्या ‘वॉक इन फ्रीजर’, ‘वॉक इन कूलर’च्या ठिकाणी रवाना केल्या जातील. त्यानंतर ग्रामीण भागातील केंद्रांकडे पाठविल्या जातील. त्यासाठी वाहनांचे नियोजन केले जात आहे. प्रारंभी केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याने कोणतीही अडचण येणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  कुलकर्णी म्हणाले.

लसीकरण केंद्र जास्तीचे लागणार एका नागरिकास लस दिल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. ३ खोल्या लसीकरण मोहिमेला लागणार आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्र जास्तीचे लागणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात गरजेनुसार तातडीने केंद्रनिर्मिती केली जाणार आहे. शास्त्रीय पद्धतीने मोहीम चालणार, बायोवेस्टेजसाठी तयारी करावी लागणार आहे, असे नियोजन प्रशासनाने केले आहे.

कोणत्या प्रकारची लस उपलब्ध होईल, यावर साठवणूक क्षमता निश्चित होईल. १२ क्युबिकल मीटरच्या परिसरात १ मिलियन डोस बसू शकतात. छावणी, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात लस साठविता येते. इतर ठिकाणीही लसी ठेवण्याची सुविधा आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस