गजेंद्र देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दृष्टिहीन असल्याचे दु:ख शब्दात सांगणे अवघड तितकाचे दृष्टी प्राप्त झाल्यावरचा अनमोल आनंदही शब्दात सांगणे कठीण असाच आहे. मात्र जिल्ह्यासह राज्यातील सुमारे २२३ अंध व्यक्तींना दिव्य दृष्टी देऊन त्यांना जग दाखविण्याचे किमया येथील डॉक्टरांनी केली आहे. गतवर्षांत ६२३ जणांनी मरणोत्तर दृष्टिदान केले.१० जून हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मागील काही वर्षांत बालपणापासूनच अंधत्व अथवा दृष्टी असण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात शासकीय सोबतच खाजगी नेत्र रूग्णालयांकडूनही नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्हा रूग्णालयात सुसज्ज नेत्रविभाग असला तरी आयबँक नाही. यामुळे येथे मरणोत्तर नेत्रदान करता येत नाही. वर्षाकाठी नेत्र तपासणी शिबीर तसेच शस्त्रक्रिया शिबीर होते. येथील गणपती नेत्रालयात मार्च २०१६ ते एप्रिल २०१७ अखेर ६२२ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. या नेत्रदानामुळे त्यांच्या आयुष्यात नव प्रकाश आला. ६२२ नेत्रदान केलेल्या नेत्रांपैकी २२३ रूग्णांवर शस्त्रक्रिया करून नेत्रारोपण करण्यात आले. तर ३९९ नेत्र संशोधनासाठी वापरण्यात आले. कॉर्निया विभागाच्या डॉ. नम्रता काबरा म्हणाल्या, जगातील कमजोर दृष्टीच्या २८४ दशलक्ष जनतेपैकी ९० टक्के विकसनशील भागात राहतात. यापैकी ८० टक्के दृष्टिदोष टाळता येऊ शकतात. दृष्टिदोष, मोतीबिंदू व काचबिंदूमुळे दृष्टी कमजोर होेते.
६२२ जणांचे नेत्रदान; २२३ अंधांना मिळाली दृष्टी
By admin | Updated: June 10, 2017 00:09 IST