शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:20 IST

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्दे ८०० टँकर सुरू : जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची माहिती

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता टँकरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले असून, त्यांनी १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ दिल्याचे जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले.ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. ते अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले आहेत. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत होती. मात्र, अजूनही अनेक मंडळांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. आजही जिल्ह्यात ५९४ गावे आणि १२४ वाड्या तहानलेल्याच आहेत. त्यामुळे जिल्हाधिकºयांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, ८०१ टँकरद्वारे या वाड्या आणि गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा लोकसभेच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार केला. त्यामध्ये दिंड्यांसोबत टँकर व आरोग्य पथकांसाठी तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यांतून पंढरपूरकडे जाणाºया जवळपास ५३ दिंड्यांसोबत ५३ टँकर व आरोग्य पथके पाठविण्यात आली आहेत. त्यासाठी ११ जुलै रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पातील तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्यात येणार आहे. तेव्हा यंदाच्या दिंड्यासोबत पाठविण्यात आलेल्या टँकरसाठी १५ लाख रुपये व आरोग्य पथकांसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. मागील वर्षी दिंड्यांसोबत दिलेल्या टँकरचे १३ लाख रुपयांचे बिल अदा करायचे आहे. त्यासाठीही १३ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई