नांदेड : लोहा तालुक्यातील शेवडी बा़ येथील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आजी- माजी संचालक मंडळ, शालेय समित्या, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश शिक्षणाधिकार्यांनी दिले आहेत़ त्याचवेळी हे खोटे गुन्हे असल्याचा दावा करताना शिवसेनेनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे़ सदर संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या नांदेडमधील तेहरानगर येथील जिजामाता प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ७ मधील अनेक विद्यार्थी बनावट व काल्पनिक नावे दाखविल्याची नोंद पुढे आल्यानंतर नांदे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के़पी़ सोने व शिक्षण विस्तार अधिकारी परमेश्वर गोणारे यांनी संस्थाचालक प्रा़ मनोहर धोंडे व संस्थेच्या इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांविरूद्ध सोनखेड, शिवाजीनगर आणि वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रारी करून गुन्हे दाखल केले़ या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी न घेता ही प्रक्रिया झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर खुद्द शिक्षणाधिकार्यांनीच १७ मे रोजी हे गुन्हे परत घेण्यासंदर्भाने कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत़ इतकेच नव्हे, तर याप्रकरणात उद्भवणार्या प्रशासकीय अडचणीस आपण व्यक्तिश: जबाबदार असाल असा इशारा देवून गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकार्यांना वार्यावर सोडले आहे़ त्यातच जि़प़सदस्या वत्सलाबाई पुयड यांनीही स्थायीच्या बैठकीत या प्रकरणाचा खुलासा मागितला होता़ अधिकार्यांची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते़ दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे प्रा़ धोंडे यांची बदनामी झाली असून अधिकार्यांविरूद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसनेच्या वतीने २६ मे रोजी जिल्हा परिषदेसमारे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाबूराव मोरे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) श्री मन्मथ स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या शाळेतील बनावट व काल्पनिक विद्यार्थ्यांच्या प्रकरणात विधानसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता़ आ़ सुभाष देसाई व प्रकाश सावंत यांनी याप्रकरणी प्रश्न मांडला होता़ याप्रकरणात चौकशी झाली काय, कारवाई काय करण्यात आली आणि चौकशी झाली नसल्यास विलंबाची कारणे कोणती, याबाबत विचारणा करण्यात आली़
विस्तार अधिकार्याविरूद्ध सेना रस्त्यावर
By admin | Updated: May 26, 2014 00:46 IST