शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 19:41 IST

राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

पैठण : राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले. या प्रसंगी बोलताना छावाचे तालुका अध्यक्ष किशोर सदावर्ते म्हणाले की, वर्षाच्या संघर्षानंतर मराठा समाजास  शिक्षण व नोकरी मध्ये १२ टक्के आरक्षण मिळाले. यासाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत शांततेत आंदोलन केली. कित्येक समाज बांधवांनी बलिदान दिले, तेव्हा कुठे राज्य शासनाने शिक्षण व नोकरीत १२ टक्के आरक्षण दिले होते. परंतू मराठा समाजाला अत्यंत कष्टाने मिळालेले आरक्षण राज्य सरकारने आरक्षणाची बाजू भक्कमपणे न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकले नाही. आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर असते, तर आज आरक्षणास स्थगिती मिळाली नसती. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार निष्काळजीपणा करीत आहे, असा आरोपही यावेळी सदावर्ते यांनी केला.

राज्य सरकारने न्यायालयात कोवीडमुळे पोलिस भरती करणार नाही असे सांगितले आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरती जाहीर करत जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. ( एस ई बी सी) प्रवर्गातील जागांबाबत राज्यशासन काय निर्णय घेणार आहे व यातून कसा मार्ग काढणार आहे, हे जाहीर करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत यांनी केला.

 मराठा आरक्षण स्थगिती उठेपर्यंत पोलीस भरती स्थगित करावी, कोपर्डी आत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाpaithan-acपैठण