शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:40 IST

मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्प : मुंबई, दिल्लीसाठी नव्या रेल्वे, प्रकल्पांना आर्थिक तरतुदीची आशा

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत आहे. आजघडीला एकेरी रेल्वे मार्गामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून परभणी-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत आहे; परंतु त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार असल्याची परिस्थिती आहे.प्रस्तावित दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग आणि रोटेगाव - कोपरगाव रेल्वे मार्गही रेंगाळला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीसगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. तसेच शिर्डी येथे जाणाºया भाविकांसाठी तसेच दक्षिण भारतात थेट गोवा येथे जाण्यासाठी रोटेगाव-कोपरगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणारा आहे. या मार्गांसंदर्भात काहीतरी अर्थसंकल्पात असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या रेल्वे सुरूहोण्यासह रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पीटलाईन महत्त्वाची ठरते. त्यामुळे नव्या रेल्वेची मागणी करणाºया मराठवाड्यातील विशेषत: औरंगाबादच्या रेल्वे प्रवाशांवर ‘पीटलाईन’च्या नावाखाली वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याचे दिसते. त्यामुळे पीटलाईन करण्याची मागणी होत आहे.नव्या रेल्वेगाड्या मिळाव्यातमुंबई, दिल्लीसह बंगळुरूसाठी नवीन रेल्वे मिळाली पाहिजे. मनमाड-परभणी मार्गाचेही दुहेरीकरण मार्गी लागण्याची गरज आहे. औरंगाबादला पीटलाईन झाली तर किमान चार नव्या रेल्वे सुरूहोऊ शकतात. अर्थसंकल्पातून नेमके काय मिळते, हे पाहावे लागेल.- भावेश पटेल, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समितीदोन मार्ग अपेक्षितरोटेगाव-कोपरगाव आणि औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव हे रेल्वे मार्ग होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे किमान हे दोन्ही मार्ग मार्गी लागतील, अशी आशा आहे. औरंगाबादला पीटलाईन होणे गरजेचे आहे.- अनंत बोरकर,अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समितीमराठवाड्याच्या काही अपेक्षामनमाड ते परभणी विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू करणे.रोटेगाव-कोपरगाव हा ३५ कि.मी. चा नवीन रेल्वे मार्ग बनविणे.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाईन बनविण्यात यावी.औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव या ८८ कि.मी. च्या नव्या मार्गाचे काम लवकर होणे.मुंबई, दिल्ली, बंगळुरूसाठी नव्या रेल्वे सुरू होणे.औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्यासाठी निधी मिळणे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBudget 2019अर्थसंकल्प 2019