श्यामकुमार पुरे
सिल्लोड : दरवर्षी पावसाळा येतो आणि वृक्ष लागवडीचा सोपस्कार पूर्ण केला जातो. वृक्ष लागवड करताना पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या विदेशी झाडांची लागवड करण्याचा घाट वन विभागासह अनेक सामाजिक संस्था घालू लागल्या आहेत. शोभिवंत दिसणाऱ्या विदेशी प्रजातींपेक्षा देशी प्रजातींची वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू होताच शाळा, महाविद्यालये, कंपनी, कार्पोरेट सेक्टर, बँका या परिसरात विविध संस्था, व्यक्तिगत स्वरूपात वृक्ष लागवडीचे उपक्रम राबविले जातात. त्यात मागील दीड ते दोन वर्षांच्या कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे देशी झाडांची लागवड करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
---
देशी झाडांसाठी चळवळ
विदेशी झाडे लावण्याऐवजी देशी झाडे लावा, यासाठी राज्यातील बायोस्पिअर्स संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, ज्येष्ठ लेखक तथा वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील, वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरिधारी, रोहित ठाकूर, शेखर गायकवाड हे राज्यात जनजागृती करीत आहेत.
---
मनी प्लॅन्ट नव्हे हानी प्लॅन्ट
घराघरात आता पाण्याच्या बाटलीत मनी प्लॅन्ट लावले जात असून, त्यामुळे समृद्धी येते, असा समज नागरिकांत पसरला आहे. बाटलीतील पाण्यात डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे पर्यावरणास उपयुक्त ठरणारी बहुगुणी देशी जातीची विदेशी झाडे लावावीत, असे पर्यावरणप्रेमी तथा अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.
---
कुठे कोणती झाडे लावावी
घरात : गुळवेल, तुळस लावावी.
गार्डन, शाळा परिसर : कदम, वावळ, निब, नाद्रुक.
जंगल परिसर : वड, पिंपळ, उंबर, करंज, वावळ, मोह, भिलावा.
नदीकाठी : मुरुड शेंग, जांभळं, चिंच, जाडूल तामन.
खडकाळ भाग : आवळा, चिंच, निंब, सतपर्णी.
दुभाजकावर : मेहंदी, जारूड, सीताफळ, अडुळसा, गौरी पुष्प, कृष्ण सारिका वेल, कोरफड, तरवड, सफेद कांचन, चित्रक, उक्षी, सफेद कुडा, रान जास्वंद, पारिजातक.
कंपाऊंड परिसरात : उक्षी, जास्वंद वर्गातील सर्व झाडे, रान जास्वंद, अंबाडी, कळलावी, चिमणाटी, खुळखुळा, तरवड (गौरी पुष्प) तुळस.
150721\img-20210714-wa0338.jpg
कॅप्शन
सिल्लोड येथील आंबेडकर चौकात विक्री साठी आलेली काही विदेशी वृक्ष रोपटे दिसत आहे.आकर्षक दिसणारी ही झाडे लोक लावत आहे...
2)आणखी काही फोटो तुम्हाला व्हाट्स अप केली आहे...