लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डोकलाम विवादानंतर देशात चीनी वस्तूच्या विरोधात जनभावना जोर धरत आहेत. हिंगोली शहरातील इलेक्ट्रिक साहित्य विक्रेत्यांनीही याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर लायटिंगसाठी वापरण्यात येणारे चिनी आपल्या दुकानांतून विक्री न करण्याचा ठरावच संघटनेच्या बैठकीत घेतला आहे.यापुढे हिंगोली शहरातील सर्व इलेक्ट्रिक साहित्याचे दुकानदार दुकानात चिनी लायटिंग ठेवणार नाहीत. त्यानंतर टप्या-टप्प्याने चीननिर्मित सर्व वस्तूंचा बहिष्कार करून जेणेकरुन लोकांना चीनी वस्तूऐवजी भारतीय किंवा अन्य देशातील वस्तू खरेदी करण्यास भाग पडणार. २२ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा हिंगोली इलेक्ट्रिकल्स असोसिएशनची बैठक बोलविण्यात आली. बैठकीत चिनच्या वागणुकीविरुध्द तीव्र संताप व्यक्त करुन यापुढे चिनी लायटिंग आणि पुढील काळात वस्तूंना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस संघटनेचे नवीन परतवार, मुरली हेडा, मनीष राठोर, ओम नैनवाणी, सुमित चांडक, विजय नैनवाणी, अमोल जैस्वाल, गिरीश शहा, गुप्ता, चावडा, शे.नासेर, सोनू परणकर यांच्यासह इलेक्ट्रिकल्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. या विक्रेत्यांनी शहरातील विविध दुकानांत लावण्यासाठी तसे फलकही तयार केले आहेत. त्याचबरोबर जनरल स्टोअर्समध्येही हे साहित्य ठेवू नये, यासाठी प्रयत्न आहेत.
चीनी साहित्य विक्रीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:30 IST