शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

खळबळजनक ! जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 13:51 IST

Murder at jadhvwani, Aurangabad : नवा मोंढा जाधववाडी  येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास उघकीस आली घटना

ठळक मुद्देमारेकरी आणि मयत हे परस्परांच्या ओळखीचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

औरंगाबाद:  नवा मोंढा जाधववाडीतील जनरल व्यापार संकुलाच्या छतावर अनोळखी ४० वर्षीय व्यक्तीचा सिमेंट गट्टुने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिडको ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. 

प्राप्त माहितीनुसार, नवा मोंढा जाधववाडी  येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर नेहमीप्रमाणे आज सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास काही लोक लघुशंका करण्यासाठी गेले.  तेव्हा तेथे अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला असल्याचे पाहून तीन ते चार जण दुरवरच उभे राहिले. सुरक्षारक्षक कंपनीचे कार्यालय तेथेच असल्यामुळे सुपरवायझर दिलीप सुरेश बोर्डे हे तेथे गेले असता त्यांनी हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसले. त्यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक एकनाथ इंगळे यांना ही घटना कळविली. इंगळे यांनी सिडको पोलीस ठाण्याला याविषयी माहिती दिली. यानंतर पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक निरीक्षक सुनील  अरबाड, फौजदार बाळासाहेब आहेर, आणि गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  सिमेंट गट्टु मारून ठेचले डोकेमारेकरी आणि मयत हे परस्परांच्या ओळखीचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. गांजाच्या गोळ्या, पाण्याची बाटली तेथे आढळून आली. कदाचित नशा पाणी करण्यावरून झालेल्या वादात जवळच पडलेला सिमेंट गट्टू मारून हा खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मयताची ओळख पटलेली नाही. ओळख पटल्यावर तसेच आरोपी पकडल्यावर  खूनाचे कारण कळू शकेल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद