शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! दुकान फोडीच्या तपासातून सापडला १२६ डिटोनेटर्सचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 12:31 IST

पैठण रोडवरील गेवराई येथील किराणा दुकान फोडून माल आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळविली होती.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केली पाहणी 

औरंगाबाद : पैठण रोडवरील गेवराई येथील दुकान फोडल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका घरावर टाकलेल्या छाप्यात डिटोनेटर्स स्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकासह तिकडे धाव घेतली. संशयित आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

जितेंद्र ऊर्फ जितूसिंग संतोषसिंग टाक (रा. अलाना कंपनीसमोर, गेवराई), असे आरोपीचे नाव आहे. पैठण रोडवरील गेवराई येथील किराणा दुकान फोडून माल आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळविली होती. त्यामुळे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि अन्य अधिकारी, कर्मचारी सोमवारी दुपारी घटनास्थळी गेले होते. 

दुकानात चोरी करणारे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी त्यातील एक आरोपी जितूसिंग टाक असल्याचे ओळखले. टाक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहे. तो अलाना कंपनी परिसरातच राहतो. पोलिसांनी लगेच त्याचे घर गाठले, पण तो घरी नव्हता. पथकाने त्याच्या घरात चोरीचा माल मिळतो, का हे पाहण्यासाठी घर झडती घेण्यास सुरुवात केली. झडतीत तेथे १२६ डिटोनेटर्स (स्फोटके) आणि वायर, कैची, चिमटा, स्क्रू ड्रायवर आढळले. एवढ्या मोठ्या संख्येने डिटोनेटर्स आढळल्याने खळबळ उडाली. 

या घटनेची माहिती तातडीने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांना पोलिसांनी कळविली. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली. बीडीडीएस पथकाच्या निगराणीखाली ही स्फोटके जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी जितूसिंगच्या विरोधात अवैध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंदविण्यात आला.

बीडीडीएसने काढला परिसर पिंजूनबॉम्ब शोधक आणि नाशक पथक, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर श्वान आणि स्फोटक शोधक यंत्रामार्फत परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, अन्य ठिकाणी कोणतेही स्फोटक वस्तू आढळली नाही.

संशयिताचा शोध घेण्यासाठी पथकेसंशयित आरोपीने ही स्फोटके कोणाकडून मिळविली आणि कोठून आणली याबाबतचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांना दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद