शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! घरात घुसून कोल्ह्याची झोक्यातील बालिकेवर झडप; इतर तीन जणांनाही केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:33 IST

काही ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी हुसकावले असता कोल्हा गावालगतच्या कपाशीच्या शेतात पळाला.

ठळक मुद्देवनविभागाचे एक पथक गावात ठाण मांडून आहे

सोयगाव : घरात घुसून कोल्ह्याने झोक्यात झोपलेल्या बालिकेवर झडप घालून उचलले. मात्र पालकांनी वेळीच प्रतिकार केल्याने कोल्ह्याने तेथून पलायन केले. मात्र यात बालिकेच्या पोटावर गंभीर जखम झाली आहे. यानंतर मंगळवारी सकाळी आणखी तीन बालकांना या कोल्ह्याने शिकार करण्याचा प्रयत्न केल्याने निंबायती ( ता.सोयगाव ) गावात खळबळ उडाली आहे. 

डोंगर रांगांतून भरकटून आलेल्या कोल्ह्याने  निंबायतीगावात सोमवारी सायंकाळी प्रवेश केला. गावात एका घरातील झोक्यात झोपलेल्या उमैय्या जुनेद तडवी (३) या बालिकेवर झडप घालत तिला उचलले. दरम्यान, पालक जागे झाले आणि त्यांनी मोठ्या शर्थीने कोल्ह्याला हुसकावून लावले. मात्र  कोल्ह्याने पोटाला चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली आहे. यानंतर मंगळवारी सकाळी अंगणात खेळणाऱ्या फैजाब अकिल तडवी (वय १४),  अक्सद मुक्तार तडवी(वय १३), रसूल उसुफ तडवी(वय २२) यांना कोल्ह्याने कडाडून चावा घेतला. यानंतरही कोल्ह्याचा निंबायती गावात धुमाकूळ सुरुच होता. काही ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी हुसकावले असता कोल्हा गावालगतच्या कपाशीच्या शेतात पळाला. वनविभागास याची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावालगत जाळे लावले असून कोल्हा पकडण्यात अद्याप यश आले नाही. दरम्यान, जखमींवर जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार, अलकाबाई लिमकर यांनी उपचार केले.

गावात कोल्ह्याने प्रवेश केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मस्तान तडवी, अकिल तडवी, जमील तडवी, जाकीर तडवी, माजी सरपंच शमा तडवी, तोसीफ शेख, अमीन तडवी आदींनी केली आहे. वनविभागाच्या वनरक्षक माया झिने, वनमजूर गोविंदा गांगुर्डे आदी कर्मचाऱ्यांचे पथक गावात ठाण मांडून आहे. 

टॅग्स :forestजंगलAurangabadऔरंगाबाद