शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दोन जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 18:45 IST

Two Corona positive after completing vaccination दोन्ही डोस घेऊन ४ ते ५ दिवस झाल्यानंतर त्रास जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देदोन्ही रुग्णांच्या लाळेचे नमुने पुन्हा तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवलेलस घेतल्यावरही कोरोनाचे नियम पाळावेच लागतील.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण सुरू करण्यात आले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोन जण पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित दोन्ही रुग्णांच्या लाळेचे नमुने पुन्हा तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

शहरात कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. मंगळवारी शहरात २८३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजनाही सुरू आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण हाती घेण्यात आले. आता १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले आहे. या दोघांचे डोस पूर्ण होऊन चार ते पाच दिवस झाले आहेत. त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

१५ दिवसांनी अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतातकोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही शहरात दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोघांचेही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. मात्र, शंका आल्यामुळे दोघांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतात. लस घेतल्यावरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम पाळावेच लागतील.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद