शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! क्वारंटाईन सेंटरमधील १ कोटीचे साहित्य चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 20:08 IST

coronavirus, Aurangabad Municipality महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर स्वतःच्या मालकीच्या इमारतींमध्ये, विविध शासकीय कार्यालये, खासगी संस्थेच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९० टक्के साहित्य चोरीला गेले आहे. जवळपास एक कोटी रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.

औरंगाबाद : कोरोना संकट काळात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात १८ पेक्षा अधिक क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली होती. क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बकेट, टीव्ही, फ्रिज, रेडिओ, माइक सिस्टिम, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन फ्लो मीटर आदी १ कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मार्च २०२० मध्ये शहरात कोरोना संसर्ग सुरू झाला. महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर स्वतःच्या मालकीच्या इमारतींमध्ये, विविध शासकीय कार्यालये, खासगी संस्थेच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना १४ दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत दर्जेदार सेवा देण्यात आली. क्वारंटाईन सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्या स्टोअर विभागाकडून ४ हजार गाद्या, ४ हजार उशा, ४ हजार कीट, ज्यामध्ये साबण, टूथब्रश, कंगवा, तेल आदी साहित्य होते. बकेट १७००, मग १७००, पिलोकव्हर ८ हजार, बेडशीट ८ हजार, माइक सिस्टिम १०, रेडिओ १०, टीव्ही १०, फ्रिज ६, संगणक ६, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन फ्लो मीटर आदी शेकडो साहित्य देण्यात आले होते. शहरातील बहुतांश क्वारंटाईन सेंटर्स महापालिकेकडून, रुग्ण नसल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. सेंटर्स बंद केल्यानंतर संबंधित साहित्य महापालिकेकडे परत जमा होणे गरजेचे होते. पण आतापर्यंत एकही साहित्य महापालिकेकडे जमा झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९० टक्के साहित्य चोरीला गेले आहे. जवळपास एक कोटी रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.

देवगिरी हॉस्टेल येथे विद्यार्थ्यांच्या सामानाची चोरीदेवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोरोना रुग्णांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे साहित्य कपाटामध्ये बंद करण्यात आले होते. कपाटातील ते सर्व साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले होते.

समाजकल्याणच्या इमारतीमधून ८६ फॅन चोरीलाकिलेअर्क येथे समाजकल्याण विभागाची इमारत महापालिकेने घेतली होती. या इमारतीमधील जवळपास ८६ सिलिंग फॅन चोरीला गेले आहेत. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहित्य गेले कुठे? तपासणी होणारमहापालिकेने कोरोना रुग्णांसाठी दिलेले साहित्य गेले कोठे, याची तपासणी करण्यात येईल. स्टोअर आणि आरोग्य विभागाची ही जबाबदारी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेले साहित्य परत महापालिका मुख्यालयात जमा होणे गरजेचे आहे.- सखाराम पानझडे, शहर अभियंता, महापालिका.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या