शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ६१ मंडळांत अतिवृष्टी; चौघांचा मृत्यू तर परभणीत २७६ गुरे वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 12:22 IST

परभणी-पाथरी, पूर्णा-नांदेड, ताडकळस-सिंगणापूर, ताडकळस-पूर्णा या मार्गावरील वाहतूक कच्च रस्ते वाहून गेल्याने ठप्प झाली होती.

ठळक मुद्देगेल्या दोन आठवड्यात पावसाने ताण दिल्याने बळीराजा चिंतित झाला होता.मात्र, दहा जुलैनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. मराठवाड्यात सलग पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.

औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. दरम्यान, नांदेड आणि परभणीत अतिवृष्टीची नोंद झाली असून नदी-नाले फुगले आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला. परभणी जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या २७६ जनावरांचा मृत्यू झाला असून ७० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला तर नांदेड जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड या चार जिल्ह्यांतील ६१ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून वाहून गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांतही रिमझिम पावसाची नोंद झाली

मराठवाड्यात सलग पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. परभणी-पाथरी, पूर्णा-नांदेड, ताडकळस-सिंगणापूर, ताडकळस-पूर्णा या मार्गावरील वाहतूक कच्च रस्ते वाहून गेल्याने ठप्प झाली होती. गंगाखेड तालुक्यात इंद्रायणी नदीला पूर आल्याने ७ गावांचा तर सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीला पूर आल्याने ११ गावांचा संपर्क तुटला होता. परभणी जिल्ह्यातील ७८ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, २०४ घरांची पडझड झाली. २५६ लहान तर २० मोठी जनावरे वाहून गेल्याने मरण पावली आहेत. परभणी शहरात २३२ मि. मी. पाासाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे. जिल्ह्यातील १६ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात पावसाने शहरी भागात नागरिकांची तारांबळ उडाली तर बळीराजा सुखावला. या पावसाने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. ३१ मंडळात एकाच दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात पावसाने ताण दिल्याने बळीराजा चिंतित झाला होता. मात्र, दहा जुलैनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर खरीप पिकेही बहरली आहेत.

हिंगोली जिल्ह्यात ११ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या बाबुलाल मकरंद पवार (७०) रा. भटसावंगी तांडा यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. वसमत येथील रहिवासी नीलेश बच्चेवर (३५) हा आकोली येथे पुलावरून रविवारी रात्री दुचाकीसह वाहून गेला होता. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १८.७ मि. मी. पाऊस पडला. जालना जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात सरासरी २०.७० मि. मी. पाऊस झाला. सर्वाधिक घनसावंगी तालुक्यात ३३.४० मि. मी. तर सर्वात कमी जाफराबाद तालुक्यात ९.६० मि. मी. पावसाची नोंद झाली.

मायलेकाचा मृतदेह सापडलाऔंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार-असोला कोंडसीमार्गे औरंगाबादकडे जाणाऱ्या कारमधील चाैघांपैकी वर्षा योगेश पडोळ (३२, रा. औरंगाबाद) आणि श्रेयश योगेश पडोळ (४) मायलेकाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास असोला गावाजवळील फर्ची पुलावरून पाणी वाहत असताना कार वाहून गेली हाेती.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेती