शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तांची क्षयरोग निदानासाठी थुंकी नमुने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 13:18 IST

कोरोना मुक्तांचे क्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकी नमुने घेण्याच्या सूचना आरोग्य संचालकांकडून मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देसहविकृती असलेल्या नागरिकांना विषेश काळजी घेण्याचा सल्ला दिला

औरंगाबाद : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे क्षयरोग तपासणीसाठी थुंकीचे नमुने घेणे सध्या सुरू असून, क्षयरोगाची शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे. आरोग्य संचालकांनी कोरोनाबाधितांच्या थुंकीचे नमुने तपासणीच्या सूचना जिल्ह्यातील आरोग्य विभागाला दिल्या आहेत.  

जिल्ह्यात सर्दी, खोकल्याने बाधित किंवा बाधित होऊन गेलेल्या रुग्णांना क्षयरोगाची लागण झाली आहे का. याची खातरजमा करण्यासाठी कोरोना मुक्त रुग्णांच्या थुंकीचे एक हजाराहून अधिक नमुने जमा करण्याचे काम क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आले, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. उल्हास गंडाळ यांनी दिली. एचआयव्ही रुग्णांना विशेष काळजी घेण्याची सूचना एआरटी सेंटरमधून देण्यात येत असल्याचे डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. दरम्यान, क्षयरोगाचे उपचार घेणाऱ्या १२४८ जणांची एचआयव्ही तपासणी केली. एकूण ९८.४९ टक्के रुग्णांची तपासणी झाली. यात २७ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले

तालुकनिहाय नियोजनमाझे कुटुंब माझी जबाबदारीतून सहविकृती असल्याच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यापैकी ज्यांना लक्षणे आहेत फक्त त्यांची तपासणी करण्यात येत आहे.  मात्र, सहविकृती असलेल्या नागरिकांना विषेश काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना मुक्तांचे क्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकी नमुने घेण्याच्या सूचना आरोग्य संचालकांकडून मिळाल्या आहेत. त्यानुसार नमुने जमा करण्यासाठी तालुकानिहाय व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयानुसार नियोजन करण्यात आले आहे, असे डाॅ. लाळे यांनी सांगितले.

एचआयव्ही रुग्णांची क्षयरोगाची तपासणी करण्याची आणि क्षयरोगाच्या रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्याचा जुनाच कार्यक्रम आहे. कोरोनामुळे राष्ट्रीय कार्यक्रमांची कामे प्रभावित झाली आहे. आता थोडी उसंत मिळाल्याने लसीकरण, कुटुंब नियोजनासारख्या कार्यक्रमांकडे लक्ष देऊन त्यांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न असेल. -डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक, परिमंडळ औरंगाबाद 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय