शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एक तास उशिराने आरोग्य सेवकांची ‘परीक्षा’

By admin | Updated: November 25, 2015 23:20 IST

लातूर : लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती सुरू करण्यात आली असून, बुधवारी दुपारच्या सत्रात आरोग्य सेवकांसाठीचा पेपर एक तास उशिराने सुरू झाला.

लातूर : लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती सुरू करण्यात आली असून, बुधवारी दुपारच्या सत्रात आरोग्य सेवकांसाठीचा पेपर एक तास उशिराने सुरू झाला. ७ केंद्रांवर ४६१ उमेदवार उपस्थित होते. तर १५४ उमेदवार गैरहजर होते. लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात देऊन पदभरतीसाठी आवेदनपत्र भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार औषध निर्माण अधिकाऱ्याच्या एका पदासाठी ३२ अर्ज आले होते. यातील २१ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ११ विद्यार्थी अनुपस्थित होते. वरिष्ठ सहाय्यक लेखाच्या एका पदाकरिता १०९ पात्र अर्ज प्राप्त झाले. यातील ८१ उमेदवारांनी परीक्षा दिली. २८ उमेदवार गैरहजर होते. कृषी अधिकारी या एका पदासाठी ३४ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. चार उमेदवार गैरहजर होते. आरोग्य सेवक पुरुष ८ पदांसाठी ४४ अर्ज प्राप्त झाले होते. २५ उमेदवारांनी परीक्षा दिली. १९ गैरहजर होते. आरोग्य सेवक महिलांच्या ८ पदांसाठी १६२ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ११० उमेदवारांनी परीक्षा दिली. ५२ उमेदवार गैरहजर होते. पर्यवेक्षिका या एका पदासाठी ७५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५६ उमेदवारांनी परीक्षा दिली. १९ उमेदवार गैरहजर होते. विस्तार अधिकारी कृषी एका जागेसाठी १७० अर्ज प्राप्त झाले. यातील १३८ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३२ उमेदवार गैरहजर होते. ७ संवर्गासाठी एकूण ४६१ उमेदवारांनी शहरातील सात परीक्षा केंद्रांवर सकाळी १० ते ११.३० तर काही केंद्रांवर दुपारी २ ते ३.३० या वेळेत परीक्षा दिली. परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा सकाळी ८ वाजेपासून हजर होता. या परीक्षा दुपारी ४ पर्यंत शांततेत पार पडल्या. (प्रतिनिधी)