शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१२ वीच्या विद्यार्थ्यांची जमिनीवर बसून परीक्षा; ‘लोकमत’च्या वृत्ताची खंडपीठाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:40 IST

रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली होती. यासंदर्भात लोकमतसह अन्य वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्ताची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट या न्यायमूर्तीद्वयींनी स्वत:हून दखल घेत त्या वृत्ताला ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून गुरुवारी (दि.२०) दाखल करून घेतले. या याचिकेवर शुक्रवारी (दि.२१) सर्वप्रथम (हाय आॅन बोर्ड) सुनावणी होणार आहे.

खंडपीठाने न्यायालयाचे मित्र (अमीकस क्युरी) म्हणून अ‍ॅड. सत्यजित एस. बोरा यांची नेमणूक केली आहे. खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. प्रतिवादी एस.एस.सी. बोर्ड आणि शिक्षण विभागाच्या अन्य प्रतिवाद्यांनी शुक्रवारी याचिकेच्या सुनावणीच्या वेळी शपथपत्राद्वारे त्यांचे उत्तर दाखल करावे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. अ‍ॅड. बोरा यांच्या विनंतीवरून खंडपीठाने शिरूर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनासुद्धा प्रतिवादी करण्याची मुभा दिली.

नेमके काय आहे प्रकरण?रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली होती. या परीक्षा केंद्राविषयी मागील दोन महिन्यांपासून पालकांच्या तक्रारी होत्या. एस.एस.सी. बोर्डाने पालकांच्या तक्रारींसंदर्भात संबंधित परीक्षा केंद्राकडून आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला होता. विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या तक्रारीच मिळाल्या नसल्याचे गटशिक्षणाधिकाºयांनी त्यांच्या खुलाशात म्हटल्याचे वाचून ‘अतीव दु:ख आणि आश्चर्य’ वाटल्याचे खंडपीठाने उद्वेगाने म्हटले आहे. अ‍ॅड. सुरेखा महाजन यांनी एस.एस.सी. बोर्डाने संबंधित परीक्षा केंद्राला पत्राद्वारे दिलेल्या सूचनांकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. बोर्डाने पत्रात म्हटले होते की, १८ फेब्रुवारीपासून १२ वीची आणि ३ मार्चपासून १० वीची परीक्षा सुरू होत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागणार नाही याची दक्षता घ्या, तशी व्यवस्था करा, असे बोर्डाने पत्रात म्हटले होते. त्यावर केंद्रचालकांनी बोर्डाला हमी दिली होती की, त्यांच्याकडे ३५० बेंच व इतर अनुषंगिक सोयी-सुविधा आहेत. केंद्राने बोर्डाची दिशाभूलच केल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयHSC / 12th Exam12वी परीक्षा