शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'सर्वांना स्मशानभूमीत यावेच लागणार...' ; महापालिका आयुक्तांचा भावनिक सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:46 IST

मी मोठा, लहान असा आविर्भाव न ठेवता चांगले काम करा

ठळक मुद्देमनपा आयुक्त म्हणाले,‘ चांगले काम करा’नागरिक, व्यापाऱ्यांना दंड, मिक्स कचरा आढळला

औरंगाबाद : महापालिका आयुक्तांसह नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचारी...प्रत्येकाला एकदा शेवटी स्मशानभूमीत यावेच लागणार आहे. त्यामुळे मी मोठा, लहान असा आविर्भाव न ठेवता चांगले काम करा, असा भावनिक सल्ला बुधवारी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.

बुधवारी सकाळी आयुक्तांनी सिंधी कॉलनी, बालाजीनगर, शिवशंकर कॉलनी, बौद्धनगर, क्रांतीचौक आदी भागांची पाहणी केली. त्यांच्या पाहणी दौऱ्याचा समारोप रमानगर येथे करण्यात आला. या ठिकाणी त्यांना स्मशानभूमी निदर्शनास आली. उपस्थित मोजक्याच अधिकाऱ्यांना त्यांनी स्मशानभूमीकडे बोट दाखवीत प्रत्येकाचा शेवट येथेच होणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून चांगले काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोंढा नाका येथून आयुक्तांनी सकाळी पाहणीला सुरुवात केली. उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलेले पेंटिंग त्यांना खूप आवडले. त्यानंतर सिंधी कॉलनीत दोन इमारतींचे बांधकाम सुरू होते; परंतु या इमारतींना संरक्षणासाठी जाळी (ग्रीन नेट) बसविण्यात आलेली नव्हती. बांधकाम साहित्यही रस्त्यावर पडले होते. आयुक्तांनी जागेवरच दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. बांधकाम मालक सुनील प्रताप यांच्यासह एकाला प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. आयुक्त पाण्डेय बालाजीनगरात पोहोचले. काही दुकानांसमोर ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी डस्टबीन ठेवण्यात आल्या होत्या. एका मिठाईच्या दुकानदाराकडे विचारणा केली असता तो म्हणाला माझ्याकडे ओला कचराच निघत नाही. त्यावर आयुक्तांनी या दुकानदारासह सर्व दुकानदारांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला.

बच्चा तुम मुझे समझाओगे और मैं...क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या बाजूला श्रीकृष्ण विजय सॉ मिल येथे आयुक्त दाखल झाले. जागा मनपाने लीजवर दिल्याचे मालक तरुणाने सांगितले. मनपाची परवानगी, अग्निशमन एनओसीही त्याच्याकडे नव्हती. जागेचा न्यायालयीन वाद असल्याचेही आयुक्तांनी जाणून घेतले. यावेळी मालक आयुक्तांना जागेच्या मालकीबाबत सांगत होता. त्याला ‘बच्चा तुम मुझे समझाओगे और मैं मान जाऊंगा तो आयुक्त किस काम के...’ असे म्हणत आयुक्त पुढे निघाले. 

रेड्डीच्या रिक्षामध्ये मिक्स कचरा कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीची रिक्षा आयुक्तांना निदर्शनास आली. रिक्षाची पाहणी केली तेव्हा मिक्स कचरा निदर्शनास आला.मिक्स कचरा पाहताच संताप व्यक्त करीत पर्यवेक्षकाला दंड करा, तसेच सर्वच रिक्षांची तपासणी करून पर्यवेक्षकांच्या पगारातून दंडाची रक्कम कपात करावी, कंपनीचे मालक रेड्डी यांना बोलावण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद