शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेच्या बंडाबाबत मातोश्रीवरून आता रोज नवीन पुड्या सोडल्या जात आहेत: अब्दुल सत्तार

By बापू सोळुंके | Updated: April 13, 2023 18:58 IST

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची आदित्य ठाकरेंच्या विधानावर टिका

छत्रपती संभाजीनगर: बंड करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन् रडले हाेते, असा खळबळजनक गौप्यस्फोट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केल्याचे विधान हे मातोश्रीवरून नवीन पुडी सोडण्याच्या प्रकारातील असल्याचे सांगत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या विधानाला अर्थ नसल्याचे पत्रकारांना सांगितले.

मतदार संघातील कामासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर कृषीमंत्र्यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिंदे हे मातोश्रीवर रडल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले असते तर कदाचित त्यांच्यावर विश्वास ठेवता आला असता, मात्र हे विधान आदित्यने केले आहेत. शिंदे यांना राजकारणाचा जेवढा अनुभव आहे, त्यापेक्षा कमी वय आदित्यचे आहे. सत्ता गेल्यापासून या बंडाबाबत मातोश्रीवरुन सतत नवीन पुड्या सोडल्या जातात. यातीलच एक ही पुडी असल्याचे सत्तार यांनी नमूद केले.

शिवसेनेसारखा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप करीत असल्याच्या आरोप होत आहे, याकडे तुम्ही कसे पहाता या, प्रश्नाचे उत्तर देताना कृषीमंत्री म्हणाले की, ईडी ही स्वायत्त संस्था आहे, कोणी कुठे अनियमितता केली असेल तर ईडी चौकशी करू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही, की अजीतदादांनी सोबत यावे, म्हणून ईडीचा दबाव टाकला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच चित्र स्पष्ट होईलराज्यातील १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निर्णय कधी येईल हे सांगता येत नाही. हा निर्णय जसा येईल,तसा आम्ही स्विकारू असे नमूद करीत या निकालानंतरच राज्यातील राजकीय ढगाळ वातावरण स्पष्ट होईल, अथवा गारपीठ होईल हे स्पष्ट होईल.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद