छत्रपती संभाजीनगर : सोन्याच्या प्रचंड वाढलेल्या दरामुळे दागिन्यांची खरेदी सामान्यांसाठी अवघड झाली असताना, सरकारच्या नव्या निर्णयामुळे सोन्याची हौस स्वस्तात पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २४ कॅरेटपासून १४ कॅरेटपर्यंत दागिन्यांची विक्री होत असली, तरी आता ९ कॅरेटचे दागिने अधिकृतपणे विक्रीला परवानगी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दसऱ्यापर्यंत हे दागिने ‘बीआयएस हॉलमार्किंग’ करुन उपलब्ध होणार आहे.
३९ हजारांत सोने, तेही हॉलमार्कसहित!सध्या २४ कॅरेटचे दर ९९,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले असून, ९ कॅरेटचे दागिने ३९,९२० रुपयांना मिळत आहेत. या नव्या दागिन्यांमध्ये ३७.५ टक्के शुद्ध सोन्याचा समावेश असून उर्वरित भागात चांदी, तांबे, झिंक व केडियम यांचे मिश्रण असते. विशेष म्हणजे, या ९ कॅरेट दागिन्यांवरही हॉलमार्कसह ‘एचयूआयडी’ क्रमांक लेझरने कोरला जाणार आहे, ज्यामुळे शुद्धतेची हमी ग्राहकांना मिळेल.
गुरुवारी काय किमतीने विकले सोनेगुरुवारी ९९ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम सोने विकले जात होते. यात ३ टक्के जीएसटीचा समावेश नाही.
किती कॅरेट- किती शुद्धता- काय किंमत१) २४ कॅरेट-- ९९.५ टक्के-- ९९८००रु२) २३ कॅरेट--९५.८ टक्के--९५८००रु३) २२ कॅरेट--९१.६ टक्के--९१८१६रु४) २० कॅरेट--८३.३ टक्के--८३८३२रु५) १८ कॅरेट--७५.० टक्के--७४८५०रु६) १४ कॅरेट--५८.५ टक्के--५९८८०रु७) ९ कॅरेट--३७.५ टक्के--३९९२०रु
वर्षभरात दीड लाख दागिन्यांवर होतेय हॉलमार्कशहरात आजघडीला ३ हॉलमार्क सेंटर आहे. येथे दागिन्यांवर ‘एचयूआयडी’ म्हणजे ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन’ हा ६ अंकी क्रमांक लेझरने टाकला जातो. यावरुन सोन्याची गुणवत्ता व शुद्धता समजते. प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्क करणे ज्वेलर्सला बंधनकारक आहे. बीआयएस, हॉलमार्किंग शिवाय दागिने विकणे गुन्हा आहे. शहरात ६५० ते ७०० ज्वेलर्स असून वर्षाकाठी दीड लाख दागिने हॉलमार्क केले जात आहे. त्यात ९ कॅरेटच्या दागिन्यांची भर पडल्याने पुढील वर्षीही हॉलमार्किंगची संख्या दुप्पट होईल.- मयूर शहाणे, व्यवस्थापक हॉलमार्क सेंटर
दसऱ्यापर्यंत मिळतील ९ कॅरेटचे दागिनेसोन्यात गुंतवणूक करणारे ग्राहक २४ कॅरेटकडे झुकतात, तर वापरासाठी २२ व १८ कॅरेटला पसंती दिली जाते. मात्र, आता ९ कॅरेटच्या परवडणाऱ्या दागिन्यांना विशेषतः तरुण वर्ग, महिला वर्ग आणि मध्यमवर्गीयांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे ९ कॅरेटचे दागिने आहेत ते हॉलमार्किंग करुन दसऱ्यापर्यंत बाजारात विक्रीला आणतील.- नंदकुमार जालनावाला, व्यापारी