शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 13:54 IST

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील, पण व्याधी असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे.

ठळक मुद्देलसीकरणासाठी आजारांचा नाही कोणताही अडथळाथंडी, ताप आला तरी घाबरू नये...

औरंगाबाद : मला हृदयरोग आहे, मला मधुमेह, अलर्जी आहे, मग कोरोना लस कशी घेता येणार, असा गैरसमज करून अनेक नागरिक लसीकरणापासून दूर राहत आहेत; परंतु हे आजार असणाऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लसीची ढाल घेता येते. त्यामुळे विविध व्याधी असणाऱ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लस घेतली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील, पण व्याधी असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे. आजार असल्याने लस घेता येत नसल्याचा गैरसमज, तसेच भीतीपोटी अनेक जण लसीकरणापासून चार हात दूर राहत आहेत; परंतु एखादी व्याधी असेल तरीही लस घेता येते. त्यामुळेच विविध आजार असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. आजारांची लसीकरण केंद्रावर योग्य ती माहिती देऊन तज्ज्ञांच्या निगराणीत लस घेता येते. त्यामुळे विविध आजार असणाऱ्यांनीही लसीकरणात एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

थंडी, ताप आला तरी घाबरू नये...लसीकरणानंतर ताप येणे, घसा खवखवणे, वाहणारे नाक, खोकला आणि सर्दीचा त्रास काही जणांना पाहायला मिळतो; परंतु लसीकरणानंतर या गोष्टी होणे सामान्य आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता कामा नये. लसीकरणानंतर लाभार्थींला गोळ्या दिल्या जातात, त्या गोळ्या वेळच्या वेळी घ्याव्यात, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

४४,१७५ -जणांना आतापर्यंत दिली लस९,९५४-इतक्या ज्येष्ठ नागरिकांना दिली लस

काय म्हणतात तज्ज्ञ...अँजिओप्लास्टी, बायपास झालेल्या रुग्णांना लस घेण्यात कोणतीही अडचण नाही. रक्त पातळ होण्याची औषधी घेणाऱ्यांनाही लस घेता येते. व्हाॅल्व्हची शस्त्रक्रिया झालेल्या, रक्त तीनपटीपेक्षा जास्त पातळ असेल तर त्यांना लसीकरणापूर्वी हे प्रमाण २ ते ३ मध्ये आणावे लागते. छोट्या साईजची निडल वापरूनही लस घेता येते.- डॉ. विलास मगरकर, हृदयरोगतज्ज्ञ

मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना अगदी सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे लस घेता येते. डायलिसिस, तपासण्यांच्या निमित्ताने हे रुग्ण रुग्णालयात वारंवार जात असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्राधान्याने या रुग्णांनी लस घेतली पाहिजे.-डॉ. आदित्य येळीकर, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ

हृदयरोग, पॅरेलिसिस, रक्तदाब, कर्करोग आणि मधुमेह असणाऱ्या या सगळ्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येते. एखादी अलर्जी असेल तरीही लस घेता येते. त्यामुळे या आजारांच्या रुग्णांनी कोणतीही भीती न बाळगता लस घेण्यास प्राधान्यक्रम दिला पाहिजे.- डॉ. तुषार चुडीवाल, मधुमेहतज्ज्ञ

हृदयरोग, रक्तदाब आहे म्हणून लस घेण्याचे टाळू नये. या रुग्णांनाही लस घेता येते. रक्त पातळ होण्याची औषधी घेत असलेल्या रुग्णांनाही लस घेण्यात कोणतीही अडचण नाही. थंडी, ताप, सर्दी असेल तरीही घाबरून जाता कामा नये.- डॉ. मानव पगारे, फिजिशियन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद