शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘मेगा’ दुरुस्तीनंतरही विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:29 IST

दहा तास अंधारात राहण्याची भीमनगर-भावसिंगपुऱ्यातील नागरिकांना शिक्षा

ठळक मुद्देकेबल उपलब्ध नसल्यामुळे झाला उशीर केबल जळाल्यामुळे १० तास नागरिक अंधारात

औरंगाबाद : छावणी उपविभागांतर्गत भीमनगर-भावसिंगपुरा या नागरी वसाहतीला विद्युत पुरवठा करणारी वाहिनी जळाल्यामुळे त्या परिसरातील वीजपुरवठा तब्बल दहा तास बंद होता. याशिवाय सिल्कमिल कॉलनी परिसरातील केबल जळाल्यामुळे बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे त्या भागातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. 

छावणी उपविभागाच्या अंतर्गत भीमनगर- भावसिंगपुरा या परिसराला विद्युत पुरवठा करणारी केबल जळाल्यामुळे बुधवारी सकाळी ६ वाजेपासून वीजपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती छावणी उपविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर जळालेल्या केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास सात- आठ तासांचा कालावधी लागल्यामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. जळालेल्या केबलच्या जागी नवीन केबल टाकण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिल्कमिल कॉलनी परिसरातील केबल जळाल्यामुळे या भागात अंधार पसरला. रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत झाला नाही. वीजपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी उकाडा व मच्छरांचा त्रास सहन करावा लागला. गुरुवारी दुपारपर्यंत या  भागातील वीजपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते; मात्र रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. 

केबल उपलब्ध नसल्यामुळे झाला उशीरछावणी उपविभागाचे अतिरिक्त अभियंता चिंचाणे यांच्याशी संपर्क  साधला असता ते म्हणाले, भीमनगर येथील केबल जळाली होती. त्यानंतर सिल्कमिल कॉलनी येथीलही केबलच जळाली. केबल उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबत वरिष्ठ कार्यालयांकडे मागणी करण्यात आली. कंडक्टर तुटले तर ते लगेच दुरुस्त केले जाते; पण केबल जळाल्यास ती तात्काळ बदलता येत नाही. केबल उपलब्ध झाल्यानंतर युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली. संपूर्ण केबल बदलावी लागत असल्यामुळे उशीर होणे अपरिहार्य आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबाद