शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसानंतरही निळवंडेचे पाणी जायकवाडीत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:33 IST

निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देहक्काचे पाणी : पाणी अडविल्याची माहिती पोहोचली शासनापर्यंत

औरंगाबाद : निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.निळवंडेतून १४ नोव्हेंबरपासून २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून सुरू असलेला निळवंडेचा हा विसर्ग शनिवारीदेखील कायम होता; परंतु त्यापुढे पाणी वळविण्याच्या उद्योगाने जायकवाडीत काही केल्या पाणी पोहोचत नसल्याचे दिसते. निळवंडेच्या पुढे ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. येथून कालव्याला पाणी सोडणे सुरूच आहे. कालवे काही केल्या बंद होत नसल्याने जायकवाडीला येणाºया पाण्याचा प्रवाह आणि वेग कमी झाला आहे.ओझर बंधाºयास छोटे-मोठे बंधारे आहेत. हे बंधारेही भरून घेण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती समजते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जायकवाडीत प्रत्यक्ष पोहोचलेले पाणी, वहन व्यय आदी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करण्याची सूचना कार्यकारी संचालकांनी केली होती. त्यानुसार ही माहिती सादर करण्यात आल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. जायकवाडीला पोहोचलेल्या पाण्याचा हिशोब शासनास सादर झाला आहे. त्यामुळे पाणी अडविण्याचा प्रकार होऊ नये, यासाठी वरच्या भागात पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारवाई केली जात आहे; परंतु प्रत्यक्षात पाणी पळविण्यास जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. निळवंडेचे पाणी रविवारी पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भेरडापूरपर्यंत आले पाणीजायकवाडीसाठी सोडलेले पाणी शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु प्रत्यक्षात येथे शुक्रवारी पाणी पोहोचलेच नाही. भेरडापूरपर्यंत शनिवारी पाणी पोहोचल्याची माहिती ‘कडा’तर्फे देण्यात आली. भेरडापूर येथून पुढे आणखी तीन बंधारे आहेत. त्यामुळे हे बंधारेही भरून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण