शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही शिक्षकांचे होते लक्ष; राजकारण, समाजकारणात त्यांच्या संस्काराचा झाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:27 IST

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रवेश केला. तेव्हा कोणीही गुरू नव्हते. जनता हीच गुरू, मार्गदर्शक म्हणून समोर आली. याच जनतारूपी गुरूचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनानुसार आगामी काळात वाटचाल सुरू राहील.

ठळक मुद्देजीवन घडविणाऱ्या शिक्षकांच्या तीन पिढ्यांसोबत ऋणानुबंध कायमराजकारणात जनता हीच गुरू

औरंगाबाद : शालेय जीवनात शिक्षकाने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर राजकारण, शिक्षण, समाजकारणात झेप घेता आली.  या शिक्षकांसोबत त्यांच्या शेवटपर्यंत नियमित संपर्क होता. आता त्या शिक्षकांच्या तीन पिढ्या होत आहेत. त्या सर्वांसोबत ऋणानुबंध कायम असल्याची कृतज्ञता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली.

घरकाम करून ज्ञान मिळविलेमाझ्या गावातील प्राथमिक शाळेत मुरलीधर वामन वाणी हे शिक्षक होते. ते १० वर्षे गावात होते. पहिली ते चौथीच्या वर्गाला तेव्हा एकच शिक्षक होता. या शिक्षकांच्या घरी पाणी आणून देणे, घर सारवणे, दूध आणून देणे, चहा करून देण्यासह इतर घरकामे आवडीने करायचो. त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. फक्त घरकामेच करीत नव्हतो, तर गुरुजी उरलेल्या वेळेत मला ट्यूशन टाईप घरीच शिकवायचे. चौथी पास झाल्यावर गावात शाळा नव्हती, म्हणून औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण येथे शिकायला जाण्यास सांगितले. त्या गावापासून मामाचे गाव पाच किलोमीटर अंतरावर होते. तेव्हा वाणी गुरुजींनी नायगव्हाणच्या शाळेतील पाटील सरांना सांगून माझ्यावर लक्ष ठेवायला लावले. वाणी गुरुजींनी गावात तर काळजी घेतलीच; पण दुसरीकडे गेल्यावरही काळजी घेतली. एवढे प्रेम माझ्यावर शिक्षकांनी केले.

वाटचाल सुकर शिक्षकरूपी गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाटचाल ही सुकर होत गेली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांनी केलेल्या संस्कारांचा मला समाजकारण व राजकारणातही फायदा झाला. सामाजिक जीवन असो वा राजकारण जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आणि माझे नेतृत्व विकसित होत गेले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आतापर्यंत वाटचाल करीत आलो आहे. यापुढेही शिक्षकांचे व त्यांच्या पुढील पिढ्यांशी संबंध कायम राहतील. 

शिक्षकांच्या विचारांचा पगडा अजूनहीशिक्षकांच्या संस्काराचा फायदा, त्यांची शिकवण आणि विचारांचा पगडा अजूनही माझ्यावर आहे. त्यांचा मला व्यावहारिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात फायदा झाला. त्यांची तिसरी पिढी आहे. त्यांच्याही संपर्कात आहे. हा संपर्क कायम राहील.

कौटुंबिक संबंध निर्माण झाले वाणी गुरुजी सोयगाव तालुक्यातील गोंदेगावचे होते. ते असताना त्यांना भेटायला नेहमी जात होतो. आजही त्यांच्या पत्नी, मुलांकडे जातो. म्हणजे शाळेत आहेत तोपर्यंत रिलेशन नाही, तर त्यानंतरही रिलेशन आहेत. घरघुगती संबंध होते. यांच्यासह युसूफ रहमान पटेल, जालन्यातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील परिहार सर, दाभाडीचे गव्हाड सर, आहेर सर असे शिक्षक आणखी स्मरणात आहेत.

राजकारणात जनता हीच गुरूमाझ्या घरात, नात्यात कोणीही राजकारणात नव्हते. मला मतदारांनीच घडवले. गावाचा सरपंच केले तेव्हा गावाने घडवले. तालुक्याचा सभापती झालो, तेव्हा तालुक्यातील जनतेने मदत केली. पुढे जाफराबाद-भोकरदन तालुक्याचा आमदार झालो तेव्हाही त्या लोकांनी प्रेम केले. त्यानंतर पाच टर्म झाले जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. एकूण ३५ वर्षे आमदार-खासदार आहे. यात माझे फार काम आहे हे म्हणण्यापेक्षा लोकांनीच माझे नेतृत्व विकसित केले आहे. गत ३५ वर्षांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे लोकांचे अमाप प्रेम मिळाले. लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि सांगतील ती कामे केल्यामुळे प्रेम करतात. 

यशस्वी जीवनासाठी योग्य मार्गदर्शक आवश्यक  असतो. त्यामुळे शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात समाधानी राहत आलो आहे. कुटुंब, राजकारण, समाजकारणात समाधानी जीवन जगत आहे. आयुष्य जगत असताना यापेक्षा अधिक काय असायला हवे. - रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री  

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेTeachers Dayशिक्षक दिनAurangabadऔरंगाबाद