शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला युरोपियन युनियनचा ‘मर्ज’ प्रकल्प मंजूर; देशातून केवळ दोनच विद्यापीठांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:51 IST

‘युरोपियन युनियन‘च्या वतीने आशियातील विविध विद्यापीठांसाठी प्रकल्पांतर्गत निधी देण्यात येतो.

ठळक मुद्देविद्यापीठाला आगामी तीन वर्षांसाठी ७५ हजार युरोचा निधी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला युरोपियन युनियनचा ‘मर्ज‘ (एमईआरजीई) प्रकल्प मंजूर करण्यात आला. दक्षिण आशियातील उच्चशिक्षणाचे सक्षमीकरण करण्यासाठी भारतातील दोन विद्यापीठांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली, अशी माहिती ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स’च्या संचालक डॉ. वंदना हिवराळे यांनी दिली.

‘युरोपियन युनियन‘च्या वतीने आशियातील विविध विद्यापीठांसाठी प्रकल्पांतर्गत निधी देण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आजपर्यंत इरासमस मुंडस, इकासा, युनाटेल आदी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, तसेच पोर्तुगाल, स्पेन, तुर्कस्थान आदी देशांसमवेत ‘एक्स्चेंज प्रोग्राम’अंतर्गत संशोधक, प्राध्यापकांना पाठविण्यात आले आहे. ‘मर्ज’ प्रकल्पासाठी भारतातून दोन विद्यापीठांची निवड केली. यामध्ये अण्णा विद्यापीठाचा (चेन्नई)देखील समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाला आगामी तीन वर्षांसाठी ७५ हजार युरोचा निधी प्राप्त झाला आहे. इकासाअंतर्गत ‘मर्ज’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.

इटली, स्पेन व रुमानिया या देशांतील जिनोआ विद्यापीठ, अ‍ॅगोरा इन्स्टिट्यूट व युनिव्हर्सिटी लुसिन बागा दिन सिबू या संस्थांचा या प्रकल्पात समावेश आहे. भारतासह आशियातील नेपाळ व आफगाणिस्तान या तीन देशांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. उच्चशिक्षण संस्था कुशल मनुष्यबळ व तरुणांना तांत्रिक ज्ञान पुरविण्याचे काम करीत असतात. आशिया, आफ्रिका खंडातील विद्यार्थी तसेच युरोप व अमेरिका खंडातील विकसित देशातील विद्यार्थी भारतासारख्या देशात शिक्षणासाठी यावेत, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण व्हावे, या हेतूने हा निधी देण्यात आला आहे. याअंतर्गत १८ हजार युरो यंत्रसामग्रीसाठी मिळणार आहेत, तर प्रशिक्षण, कार्यशाळा, वेबिनारसारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे डॉ. हिवराळे म्हणाल्या. 

संशोधनाला गती   देणार : कुलगुरू‘इन्क्युब्युशन सेंटर’च्या माध्यमातून संशोधन व नवोन्मेष याला प्राध्यान्य देत आहे. ‘कोविड-१९’ नंतरचे जीवन ‘न्यू नॉर्मल लाईफ’ म्हणून ओळखले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर  दर्जेदार संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. युरोपियन युनियनने ‘मर्ज’ प्रकल्पासाठी निवड केली ही आनंदाची बाब आहे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादfundsनिधी