शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू थुंकणाऱ्या पुजाऱ्यांना प्रवेशबंदी; संस्थानचा कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:52 IST

तुळजाभवानी मंदिर परिसरात ८ पुजाऱ्यांनी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याची बाब उघडकीस आली होती.

तुळजापूर (जि.धाराशिव) : तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबद्दल मंदिर संस्थानकडून गुरुवारी ८ पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्यांना नोटिसा देऊन खुलासा मागविण्यात आला होता. तो समाधानकारक न वाटल्याने मंदिर संस्थानने पुजाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

तुळजाभवानी मंदिर परिसरात ८ पुजाऱ्यांनी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याची बाब उघडकीस आली होती. मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. त्यातून मंदिराची स्वच्छता व पावित्र्य भंग होत असल्याने मंदिर संस्थानने आठही पुजाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविला होता. दरम्यान, यातील लखन रोहिदास भोसले, अक्षय किशोर कदम-भैय्ये, विशाल हनुमंत चव्हाण, धीरज राजू चोपदार, वैभव खुशालराव भोसले, राहुल हनुमंत पवार या सहाजणांनी मंदिर संस्थानकडे माफीनामा सादर केला होता. त्यानुसार संस्थानने या सर्वांना १ महिन्यासाठी मंदिर प्रवेशबंदी केली आहे. तर विशाल दादासाहेब मगर व विशाल बाळासाहेब गंगणे या दोघांनी नोटिसीला कोणतेही उत्तर न दिल्याने त्यांच्यावर ३ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली.

देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाईसंबंधित पुजाऱ्यांना अशोभनीय व मंदिराच्या शिस्तीस बाधा आणणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे वर्तन करण्यास जबाबदार ठरवण्यात आले आहे. ही बाब मंदिराच्या देऊळ कवायत कायदा १९०९ च्या कलम २४ व २५ चे उल्लंघन करणारी ठरत असल्याने त्यानुसार प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली.

मंदिराचे पावित्र्य राखावे तुळजाभवानी मंदिरात तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने आठ पुजाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यातील सहा पुजाऱ्यांनी माफीनामा दिल्याने त्यांना १ महिन्यांसाठी तर उत्तर न देणाऱ्या दोघांना ३ महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी भाविकांसह पुजाऱ्यांनीही धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ मंदिरात टाळावेत.-अरविंद बोळंगे, व्यवस्थापक तहसीलदार, तुळजाभवानी मंदिर संस्थान.

टॅग्स :dharashivधाराशिव