शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
3
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
4
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
5
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
6
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
7
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
8
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
9
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
10
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
11
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
12
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
13
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
14
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
15
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
16
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
17
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
18
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
19
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
20
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक मनीष धूत यांची कोटींची फसवणूक, दिल्लीच्या इरिषा अग्रीटेकच्या संचालकांवर गुन्हा दाखल

By सुमित डोळे | Updated: July 11, 2024 19:40 IST

आधी मराठवाड्यासाठी डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी विनंती, नंतर त्यांच्या नावाचा वापर करून परस्पर डीलर नेमून उकळले पैसे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी विनंती करून दिल्लीच्या इरिषा ॲग्रीटेक प्रा. लि. च्या संचालकांनी उद्योजक मनीष धूत यांची १ कोटी ५ लाखांची फसवणूक केली. शिवाय, त्यांच्या नावाचा गैरवापर करून मराठवाड्यात परस्पर डीलर नेमून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. बुधवारी वेदांतनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी इरिषा अॅग्रीटेक कंपनीचे दर्शनसिंग राणा, त्यांचा मुलगा सुधीर राणा, समूह अध्यक्ष परमिंदर सिंग बवेजा, मनीष कुमार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

डिसेंबर, २०२१ मध्ये किरण इंदुलकर, उमेश मुलमुले नामक व्यक्तीने भेट घेतली. इरिषा कंपनीची ओळख सांगून रशियाच्या बेलारूस कंपनीचे शेती उपयोगी अवजारे कंपनी उत्पादित करत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील उद्योग जगतात दबदबा असल्याने तुम्ही कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप घेण्याची गळ त्यांनी घातली. सुरुवातीला धूत यांनी नकार दिला. मात्र, विविध आश्वासने देत त्यांनी धूत यांना विनंती केली. त्यानंतर धूत यांनी दिल्लीला जाऊन कंपनीची पाहणी केली. आरोपी मालक राणाची भेट घेतली. जानेवारी, २०२२ मध्ये राणाने शहरात येत धूत यांना लेटर ऑफ इन्टेन्ड दिले. धूत यांनी तेव्हा त्याला ५ लाख रुपये अदा केले. शिवाय, करार झाल्यानंतर एक कोटी रुपयांची पूर्तता केली. त्या बदल्यात राणाने सात ट्रॅक्टर, १२ रोटोव्हेटर व अन्य उत्पादने पाठवले.

एकही आश्वासन पाळले नाहीराणाने धूत यांना पहिले डीलर नेमण्याचा अधिकार दिला होता. परंतु पैसे मिळताच त्याने धूत यांच्या नावाचा गैरवापर करून परस्पर डीलर नेमले. सांगितल्याप्रमाणे विविध टक्केवारी, अनामत रक्कमेवरील व्याजाचे आश्वासनदेखील पाळले नाही. उत्पादन विक्री दरम्यान राणाच्या कंपनीला ऑटोमाेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाची परवानगीच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्या कुठल्याच उत्पादनाला चेसीस क्रमांक नसून आरटीओ पासिंगच मिळणार नव्हती. धूत यांनी आरोपींना वारंवार संपर्क केला. मात्र, आरोपींनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. अनेक डीलरकडून डिलरशिपसाठी लाखो रुपये उकळले. धूत यांनी कंपनीने सुरुवातीला दिलेले उत्पादने कंपनीला परत केली. मात्र, तरीही कंपनीने रक्कम दिली नाही. त्यामुळे धूत यांनी कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला. निरीक्षक प्रवीणा यादव, उपनिरीक्षक विनोद मोरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबाद