शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत रंगिलो दांडिया’ची सर्वत्र धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:12 IST

दांडियाच्या रंगात रंगलेल्या तरुणाईचा चैतन्यपूर्ण जल्लोष प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुटुंबियांसोबत धमाल करीत मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद शहरातील तरुणाईने लुटला आणि प्रोझोनच्या हिरवळीवर जणू आनंदाला, उत्साहाला उधाण आले. दांडियाच्या रंगात रंगलेल्या तरुणाईचा चैतन्यपूर्ण जल्लोष प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान दिसून आला.विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते आरती झाली. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप बिश्नोई, विजय वाडकर, खुशालचंद बाहेती, प्रीतम दरख, प्रोझोनचे मोहम्मद अर्शद, मनोज बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनीही प्रोझोन येथे भेट देऊन गरबाप्रेमींचा उत्साह वाढविला. पारंपरिक वातावरणात पारंपरिक गीतांवर नृत्य करीत खेळल्या जाणाºया दांडिया हे ‘लोकमत रंगिलो दांडिया’चे खास वैशिष्ट्य. ‘पंखिडा...’, ‘सावन मे...’, ‘माँ शेरोवाली...’ या गाण्यांवर सुरेख लय पकडत तरुणांनी केलेला रास दांडिया लक्षवेधक ठरला.आजचा दिवस (दि. २७) सखीमंच सदस्या आणि प्रिव्हिलेज मंचच्या सदस्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. कारण केवळ आजच या सदस्यांना दांडिया खेळण्यासाठी किंवा बघण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. फूड-फन-फॅ मिली असा तिहेरी आनंद देणाºया या महोत्सवाला नक्की भेट द्या. सृष्टी हॉटेल, अ‍ॅग्रो टुरिझम अ‍ॅण्ड नर्सरी हे असोसिएट पार्टनर आहेत. भाग्यविजय, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, कुचिना दरक डिस्ट्रिब्युटर्स, एक्सप्रेसो कॉफी हे या उत्सवाचे सहप्रायोजक आहेत. संदीप साऊंड म्युझिकल ग्रुपच्या राहुल चोथमल, कुणाल वराळे, प्रीती सामंत, प्रिया नरवडे या गायकांनी, तसेच रवी प्रधान, महेंद्र नरवडे, अभय सामंत, योगेश तुपे, योगेश कांबळे, अल्कित नरवडे या वाद्यवृंदांनी कार्यक्रमात रंगतआणली.