शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन

By मुजीब देवणीकर | Updated: August 11, 2023 19:41 IST

स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय.

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिटमिटा येथे १०० हेक्टर जागेवर भव्यदिव्य सफारी पार्कच्या उभारणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पातील असंख्य अडथळे दूर करण्यात आले. सफारी पार्कला लागूनच खुल्या जंगलात टायगर सफारीचा आनंदही पर्यटकांना घेता येईल. या प्रकल्पासाठी १७ हेक्टर जमीन जिल्हा प्रशासन देणार असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय. जवळपास २५० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग, मिटमिटा येथील १०० हेक्टर जमिनीवरील अतिक्रमणे, शेतकऱ्यांचे आंदोलन आदी कारणांमुळे प्रकल्प उभारणीला प्रचंड विलंब होत होता. स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. काहींवर फौजदारी कारवाई केली. शेतकऱ्यांना ७ मीटरचा रस्ता हवा होता, तो सुद्धा मार्गी लावला. सफारी पार्कमध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत.

पहिला प्राण्यांना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार सोयीसुविधा देणे आणि दुसरा म्हणजे विविध इमारतींची उभारणी होय. दोन्ही कामे जवळपास २५ टक्क्यांहून अधिक झाली असून, डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे प्रकल्प प्रमुख इम्रान खान यांनी सांगितले.सफारी पार्कसाठी अग्निशमन विभागाने एनओसी दिली. त्यामुळे पाणीपुरवठा, ड्रेनेज, इलेक्ट्रिक वर्क, अग्निशमन यंत्रणा, सर्व्हिस रोड, जलकुंभ, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणारा एसटीपी प्रकल्प उभारण्यास गती दिली जाईल. प्राण्यांसाठी ४० मोठमोठे पिंजरे, घरे उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यातील २९ पूर्ण करण्यात आले. १५ पैकी १० इमारतींचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील पहिलाच प्रकल्पओपन टायगर सफारी हा प्रकल्प राज्यात कुठेही नाही. आरक्षित खुला प्रकल्प आहेत. ओपन सफारीमुळे पर्यटनाच्या राजधानीत पर्यटकांचा ओढा दुपटीने वाढेल. १७ हेक्टरवरील हा प्रकल्प बराच मोठा असणार असून, येथील वातावरण प्राण्यांना पोषक असणार आहे. जन्मदरही वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :TigerवाघAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका