शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सोनपेठ येथे विद्यार्थ्यांच्या शोधात इंग्रजी शाळांचे शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 19:43 IST

इंग्रजी शाळांचे पेव ग्रामीण भागातही पोहचले आहे़ शाळा वाढल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळांमध्येच स्पर्धा लागली असून, विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट शिक्षकांना देण्यात येत आहे़ 

सोनपेठ (परभणी ) : इंग्रजी शाळांचे पेव ग्रामीण भागातही पोहचले आहे़ शाळा वाढल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळांमध्येच स्पर्धा लागली असून, विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट शिक्षकांना देण्यात येत आहे़ 

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावत चालल्याने पालकांची खाजगी शाळांकडे ओढ लागली होती़ मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांसोबत आता इंग्रजी शाळाही आल्या आहेत़ आपल्या पाल्याला स्पर्धेमध्ये टिकविण्यासाठी इंग्रजी आली पाहिजे, अशी मानसिकता पालकांमध्ये निर्माण झाली आहे़ त्यामुळे आर्थिक सक्षम असलेले पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळांमध्ये टाकत आहेत़ इंग्रजी शाळांमध्ये एका विद्यार्थ्यांमागे १५ ते २० हजार रुपये शिकवणी फिस मिळत असल्याने इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ आता तर ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा स्थापन करण्यात येत आहेत़ दोन वर्षांमध्ये इंग्रजी शाळांमध्ये स्पर्धा लागली आहे़ सोनपेठ तालुक्यातही वाडी-तांड्यापर्यंत इंग्रजी शाळा पोहचल्याने विद्यार्थी मिळविताना संस्था चालकांना कसरत करावी लागत आहे़ 

विद्यार्थ्यांकडून आपल्याला शैक्षणिक फिस कशी मिळविता येईल, यासाठी शाळेचे महत्त्व पटवून दिले जात आहे़ या शैक्षणिक वर्षासाठी जानेवारी महिन्यापासून २५ टक्के मोफत प्रवेशाला सुरुवात झाली आहे़ अनेक पालकांनी २५ टक्के प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत़ या प्रवेशासाठी अद्याप पूर्ण प्रक्रिया झालेली नाही़ परंतु, संस्था चालक मात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळेवरील शिक्षकांनाच जुंपवित असून, प्रत्येक शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट दिले जात आहे़ तालुक्यात पालकांशी संवाद साधताना इंग्रजी शाळेवरील शिक्षक दिसून येत आहेत़ 

पात्रताधारक  शिक्षकांचा अभावइंग्रजी शाळेच्या नावाखाली अनेक ठिकाणी अपात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे़ इंग्रजी माध्यमाचे शिक्षक आवश्यक असताना मराठी माध्यमातील शिक्षक अनेक ठिकाणी कार्यरत आहेत़ यामध्येही काही शिक्षकांनी डी़एड़्, बी़एड़ ही पदवीही घेतली नसल्याचे बोलले जात आहे़ कमी पगारात शिक्षक मिळत असल्याने संस्था चालकही याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ नर्सरी ते सिनीअर केजीसाठी १० हजारांपर्यंत शुल्क सोनपेठ तालुक्यात आकारले जात आहे़ याशिवाय पुस्तके, गणवेश, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी ठराविक दुकानांची नावे सांगितली जात आहेत़ 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र