शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

अभियंता बनला चोर!

By admin | Updated: August 24, 2014 01:49 IST

चोरीकडे वळलेल्या एका मेकॅनिकल इंजिनिअरला गुन्हे शाखा पोलिसांनी काल अटक केली.

औरंगाबाद : एक तर व्यवसायात अपयश आले, पाठोपाठ नोकरी गेली अन् लॉटरीचे व्यसन जडल्याने उरलेसुरले पैसेही संपले. त्यातच आजारपण मागे लागले... अशा या परिस्थितीने चोरीकडे वळलेल्या एका मेकॅनिकल इंजिनिअरला गुन्हे शाखा पोलिसांनी काल अटक केली. सुनील प्रभाकर धोंडगे (२९, रा. मुदखेड, नांदेड), असे त्या अभियंता असलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून आतापर्यंत चोरीचे पाच लॅपटॉप अन् एक कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व वस्तू त्याने शहरातील विविध हॉस्पिटल्समधूनच चोरल्या आहेत. उपचार घेण्याचा बहाणा करीत तो हॉस्पिटलमध्ये जायचा आणि संधी साधून डॉक्टरांचे लॉपटॉप व इतर वस्तू चोरी करायचा, असे तपासात उघडकीस आले.या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, एक तरुण हा चोरीचा कॅमेरा विक्री करण्यासाठी निराला बाजार परिसरात येणार असल्याची माहिती काल गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी खबऱ्याने सांगितलेले ठिकाण गाठले. तेथे सुनील धोंडगे आला. चोरीचा कॅमेरा विकण्यासाठी आला तो हाच असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘खाक्या’ दाखविताच अखेर त्याने तोंड उघडले. हा कॅमेरा आपण घाटी रुग्णालयातून चोरी केला असून तो एका डॉक्टरचा आहे, अशी त्याचे कबुली दिली. या चोरीप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक विचारपूस केली असता त्याने शहरातील एमजीएम, हेडगेवार व घाटी रुग्णालयातून संगणकाचे मॉनिटर, डॉक्टरांचे काही लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली.उपचाराला गेला अन् चोरी...औरंगाबादेत सुनीलला अपघात झाला. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बसल्यानंतर अचानक डॉक्टर कॅबिनमधून उठून बाहेर गेले. समोर लॅपटॉप पडलेला होता. येथे कुणी नाही, लॅपटॉप चोरला आणि तो विकला तर पैसे मिळतील, आपली उपजीविका तरी भागेल, असा विचार करीत सुनीलने लॅपटॉप उचलला आणि धूम ठोकली. त्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर त्याने चोरीचा मार्ग आणि त्यासाठी अशीच पद्धत वापरण्यास सुरुवात केली. उपचाराच्या बहाण्याने दवाखान्यात जायचे अन् संधी साधून डॉक्टरचा लॅपटॉप किंवा इतर वस्तू चोरायच्या, असे त्याने सत्रच सुरू केले होते. अशा पद्धतीने त्याने चोरलेले चार लॅपटॉप, एक मॉनिटर व कॅमेरा, असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज सुनीलकडून हस्तगत केल्याचे निरीक्षक आघाव यांनी सांगितले. परिस्थितीमुळे स्वीकारला चोरीचा मार्गसगळीकडूनच अपयश४सुनीलने मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेले आहे. तो पुण्यात एका चांगल्या कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीला होता. त्याच काळात त्याने पुण्यातील तेरणे फाटा येथे आइस्क्रीम पार्लर आणि मल्टी सर्व्हिस सेंटर सुरू केले. मात्र, सुरुवातीलाच त्याला व्यवसायात मोठा घाटा झाला. त्यातच त्याची नोकरी गेली. पत्नीही माहेरी निघून गेली. ४एकाच वेळी सगळीकडून संकटात सापडलेल्या सुनीलने झटपट पैसे कमविण्यासाठी लॉटरीचा मार्ग निवडला. त्यात तो होते नव्हते ते सगळेपैसे गमावून बसला. सगळे काही गमावल्यानंतर पुणे सोडून तो औरंगाबादला आला. येथे बजाजनगरात असलेल्या नातेवाईकाच्या खोलीत राहू लागला. घाटीत धुमाकूळआरोपी सचिनने तर घाटी रुग्णालयात धुमाकूळच घातला होता. गेल्या महिनाभरात त्याने घाटी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली जाऊन तेथील डॉक्टरांचे चार लॅपटॉप चोरी केले होते. लॅपटॉप चोरीच्या या सत्राने डॉक्टर हैराण झालेले होते, हे विशेष.