शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड भरतीसाठी इंजिनिअर, एम.एस्सी., बी.एड. उमदेवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:46 IST

येथील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) रिक्त ५४५ पदभरतीसाठी बी.ए., बी.कॉम., एलएल.बी., एम.एस्सी., एम.ए., बी.एड, इंजिनिअर, अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बेरोजगारीमुळे हे उच्चशिक्षित तरुण-तरुणी आलेली प्रत्येक संधी अजमावून पाहत आहेत. नोंदणीकृत २ हजार ५७३ उमेदवारांची गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी क्रीडा मैदानावर शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पात्र ठरलेल्या २ हजार ४४५ उमेदवारांच्या शारीरिक चाचणी गुणांचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा होमगार्ड भरती प्रक्रिया : ५४५ पदांकरिता २,५७३ उमेदवारांचे अर्ज

औरंगाबाद : येथील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) रिक्त ५४५ पदभरतीसाठी बी.ए., बी.कॉम., एलएल.बी., एम.एस्सी., एम.ए., बी.एड, इंजिनिअर, अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बेरोजगारीमुळे हे उच्चशिक्षित तरुण-तरुणी आलेली प्रत्येक संधी अजमावून पाहत आहेत. नोंदणीकृत २ हजार ५७३ उमेदवारांची गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी क्रीडा मैदानावर शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पात्र ठरलेल्या २ हजार ४४५ उमेदवारांच्या शारीरिक चाचणी गुणांचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.जिल्हा होमगार्डच्या समादेशक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले की, जिल्हा होमगार्डसाठी १ हजार ६५० होमगार्ड जवानांची मंजुरी आहे. यापैकी सध्या १ हजार १०५ जवान कार्यरत आहेत. रिक्त ५४५ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी क्रीडा मैदानावर गुरुवारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीसाठी २ हजार ५७३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील बहुतेक उच्चशिक्षित असल्याचे डॉ. धाटे-घाडगे यांनी सांगितले. या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत २ हजार ४४५ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले. पात्र पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक आणि १ हजार ६०० मीटर धावणे ही स्पर्धा घेण्यात आली, तर महिला उमेदवारांकरिता ८०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील उमेदवारांचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध क रण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया डॉ. धाटे-घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक़, ३० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३०० कर्मचारी राबवीत आहेत.चौकटअशी आहेत रिक्त पदे...औरंगाबाद शहर पुरुष १६, महिला १२५, औरंगाबाद ग्रामीणमधील वैजापूर पुरुष ३९, महिला २३, गंगापूर पुरुष ६१, महिला २७, सिल्लोड पुरुष ३०, महिला ९, खुलताबाद पुरुष ३८, महिला १९, सोयगाव पुरुष ३३, महिला २४, कन्नड पुरुष २६, महिला २०, पैठण पुरुष ३६, महिला १९.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद