शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘अ‍ॅग्रो टुरिझम’मुळे मिळतोय ‘एनर्जी बुस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:35 IST

आऊटिंगच्या माध्यमातून वाढतेय निसर्ग सान्निध्य

- अबोली कुलकर्णी

औरंगाबाद : धकाधकीचे जीवन आणि कामाच्या व्यापामुळे आयुष्यातील चार निवांत क्षण कुटुंबासोबत जगण्यासाठी प्रत्येक जण संधी शोधत असतो. मग वीकेंडला असलेल्या सुटीचा पुरेपूर उपभोग घ्यायचा म्हणून कुठेतरी आऊटिंगला जाऊ असे विचार डोक्यात येऊ लागतात. अशावेळी निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी ठिकाणे आकर्षित करू लागतात. मुंबई-पुण्याची वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याची संकल्पना आता औरंगाबादेतही रुजू पाहतेय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामीण भागातील शेती, निसर्गसौंदर्य, पक्ष्यांचा किलबिलाट, दुर्मिळ झाडे, थंडगार सावली, विहीर, तलाव, जुनी घरे यांच्या सान्निध्यात जाऊन राहण्याचा आनंद काही औरच असतो. शहरात स्थायिक झालेली प्रत्येक व्यक्ती ही मजा क्षणोक्षणी ‘मिस’ करते. मात्र, मुंबई-पुणे येथे वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याचा ट्रेंडच आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंब, मित्र परिवार यांच्यासोबत रिलॅक्स होण्यासाठी दोन दिवस निसर्गरम्य ठिकाणी जातात. आता हाच ट्रेंड औरंगाबादेत रुजू पाहतोय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळताना दिसत आहे. या संकल्पनेंतर्गत विविध सोहळे, प्री-वेडिंग फोटोशूट, गेट टुगेदर, समारंभ, पार्टी यांचे आयोजन करता येते. आठवडाभराच्या कामासाठी दोन दिवसांचे ‘एनर्जी बुस्ट’ या ट्रेंडमुळे मिळते.

चिकूच्या बागेत डोहाळ जेवण, व्याही भोजन‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेंतर्गत शहराच्या बाहेर ठराविक हेक्टरच्या परिसरात झाडे, फुले, जुनी घरे, खेळण्या, वेगवेगळे खेळ, चिकूच्या बागा, विहिरी, बलुतेदारी यांच्या माध्यमातून त्या जागेला ग्रामीण टच देण्यात येतो. अशा ठिकाणी डोहाळ जेवण, व्याही भोजन, गेट टुगेदर, वाढदिवस, सहस्रचंद्रदर्शन, किटी पार्टी, भिशी पार्टी, शालेय सहली, घरगुती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेतले जातात. शांत, निवांत जागी चार आनंदाचे क्षण अनुभवल्याचा आनंदही लुटता येतो. 

ग्रामीण टचवाढते शहर, प्रदूषण, धकाधकीचे आयुष्य यांच्यामुळे प्रत्येकाला स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ द्यायचा असतो. अ‍ॅग्रो टुरिझम या ताणावर अगदी योग्य उपाय झाला आहे. वेगवेगळी शक्कल लढवीत व्यावसायिक आऊटिंग अगदी नैसर्गिक ठेवतात. अगदी ग्रामीण टच ठेवून व्यवस्था असल्याने तुम्ही निसर्गाच्या अगदी जवळ जाता.

टॅग्स :tourismपर्यटनagricultureशेतीFarmerशेतकरी