शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर’ची साडेसाती संपेना; आता मनपा आयुक्त सुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:08 IST

शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नाहीत.

ठळक मुद्देसमांतर जलवाहिनीबाबत मागील एक महिन्यापासून महापालिकेत अक्षरश: टोलवाटोलवी सुरू आहे.कंपनीचे अधिकारी भेटायला तयार नसल्याने वारंवार हा विषय पुढे ढकलण्यात येत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे.

औरंगाबाद : शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नसल्याने सत्ताधाऱ्यांना हा विषय आता पुन्हा पुढे  ढकलण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे ‘समांतर’ला शनिची वक्रदृष्टी लागली असल्याचे दिसत आहे. 

शहरातील १५ लाख नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीबाबत मागील एक महिन्यापासून महापालिकेत अक्षरश: टोलवाटोलवी सुरू आहे. कंपनीचे अधिकारी भेटायला तयार नसल्याने वारंवार हा विषय पुढे ढकलण्यात येत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. आयुक्त डॉ. विनायक यांनी मागील महिन्यातच समांतर जलवाहिनीसंदर्भात सर्वसाधारण सभेसमोर ठराव मांडला आहे. पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी कायगाव येथे पहिली आत्महत्या झाल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. ६ आॅगस्ट रोजीही सत्ताधाऱ्यांनी दिवसभर सर्वसाधारण सभा चालवूनही समांतरवर चर्चा केली नाही. शनी अमावास्येच्या दिवशी म्हणजेच ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सभा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शनी अमावास्या आमच्यासाठी चांगली असल्याची प्रतिक्रियाही महापौरांनी नोंदविली होती.

शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तीन दिवसांची सुटी टाकली आहे. त्यांना वैयक्तिक कारणासाठी मालेगाव, चंदीगढ येथे जायचे आहे. शनिवारी सकाळीच ते रवाना होणार आहेत. आपण सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकणार नाही, याची पूर्वसूचना महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग किंवा डी. पी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सत्ताधाऱ्यांना सभा चालवावी लागेल. समांतरचा मूळ ठराव आयुक्तांनी ठेवला असल्याने त्यांच्या उपस्थितीतच चर्चा व्हावी अशी नगरसेवकांची मागणी आहे. सभेत आयुक्त उपस्थित राहणार नसल्याने दुसऱ्या विषयांवरच चर्चा अपेक्षित आहे.

समांतरने वर्षभरात शहरात पाणीयेत्या वर्षभरात जायकवाडी धरणातून समांतरने शहरात पाणी आणल्या जाईल, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी येथे दिली. ‘क्रेडाई’ बांधकाम व्यावसायिकांच्या स्थानिक शाखेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी, महापौर नंदकुमार घोडेले यांनी समांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना परदेशी म्हणाले की, समांतरमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. यासंदर्भात बैठकाही घेतल्या आहेत. पुढील नियोजन लक्षात घेता येत्या वर्षभरात समांतरने पाणी शहरात आणल्या जाईल, अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद