शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमणे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:35 IST

वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमणे हटविण्यासाठी एमआयडीसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चार महिन्यांतच अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाली आहेत.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम थंडावल्यामुळे या परिसरातील विविध सेक्टर व मुख्य चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी एमआयडीसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चार महिन्यांतच अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाली आहेत.

सकल समाजाच्यावतीने चार महिन्यांपूर्वी ९ आॅगस्टला पुकारण्यात आलेल्या बंदला वाळूज उद्योगनगरी हिंसक वळण लागले होते. या बंदच्या आडून समाजकंटकांनी उद्योगनगरीत बहुताश कंपन्याला टार्गेट करीत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. या घटनेमुळे उद्योजक संघटनांनी समाजकंटकावर कारवाई करण्यासह अतिक्रमणे हटविण्याची मागणी एमआयडीसी व पोलीस प्रशासनाकडे लावून धरली होती. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने वाळूज उद्योगनगरी तसेच बजाजनगरात अतिक्रमणे हटवून जवळपास दीड हजार अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली होती.

या कारवाईचा धसका घेत अनेक अतिक्रमणधारकांनी नुकसानीच्या भितीमुळे स्वत:हून अतिक्रमणे हटविली होती. यामुळे विविध सेक्टर व चौकांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, आता पुन्हा अतिक्रमणे वाढू लागली आहेत. आजघडीला उद्योनगरीत कामगार चौक, एफडीसी चौक, महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी चौक, रांजणगावरोड, सीएट रोड, एनआरबी चौक आदी ठिकाणी तसेच विविध सेक्टरमध्ये हॉटेल व टपऱ्यांची अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. या परिसरातील अतिक्रमणे कायमस्वरुपी हटविण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पावले उचलली जात असल्याचे एमआयडीसी विभागातील सूत्रांनी सांगितले.

अतिक्रमणांमुळे उद्योजकांत नाराजीवाळूज उद्योनगरीत पुन्हा अतिक्रमण वाढत चालल्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश अतिक्रमणधारक मोकळे भूखंड व रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय थाटत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यामुळे वाहने, उद्योजक, कामगार व वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अब्दुल शेख, राहुल मोगले, अर्जुन गायकवाड, जगदीश जोशी, दिंगबर मुळे, अर्जुन आदमाने आदींनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणWaluj MIDCवाळूज एमआयडीसी